Nirmala Nawale: पुण्याच्या सरपंच बाई का होतायेत एवढ्या ट्रोल, 'रेंज रोव्हर' घेऊन फिरणाऱ्या निर्मला नवले आहेत तरी कोण?
Nirmala Nawale Latest News : पुणे जिल्ह्यातील कोरेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलीय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोशल मीडियावर सरपंच निर्मला नवलेंचीच हवा

इंजीनिअर असणाऱ्या निर्मला नवलेंनी राजकारणात का केली एन्ट्री?

निर्मला नवलेंची राजकारणात कशी झाली सुरवात?
Nirmala Nawale Latest News : पुणे जिल्ह्यातील कोरेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलीय. इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स असणाऱ्या निर्मला नवले सामजिक आणि राजकीय क्षेत्रातही खूप सक्रीय असतात. नवऱ्याकडून रेंज रोव्हर कार गिफ्ट मिळाल्याचा व्हिडीओ नवले यांनी नुकताच सोशल मीडियावर शेअर केला होता. दरम्यान, निर्मला नवले यांनी आयटी इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने त्यांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी दिलीय. 27 वर्षांच्या निर्मला नवले यांची कोरेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. उच्चशिक्षित सरपंच म्हणून त्यांची राजकीय क्षेत्रात ओळख निर्माण झाली आहे. महिला सबलीकरण आणि ग्रामीण भागात विकासकामे करण्याकडे त्यांचा जास्त फोकस असतो.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत निर्मला नवले म्हणाल्या, "मला सोशल मीडियावर जो प्रतिसाद मिळतो, त्याकडे मी सकारात्मक दृष्टीने बघते. मी गावात जी काही कामं केली, पार्टीच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचल्या जातात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार लाखो, करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकतात. याकडे मी सकारात्मक दृष्टीने पाहते. समाजात काम करायचं म्हटलं तर दोन्ही बाजू असतात. विरोध हा होत असतो. जे लोक वाईट कमेंट्स करतात, त्यात त्यांची पर्सनॅलिटी दिसून येते. त्यांचं कर्तृत्व काय असतं, हे कुणालाच माहित नसतं. त्यामुळे मी त्या गोष्टीचा जास्त विचार करत नाही. त्यांच्यावर झालेले संस्कार त्या कमेंट्समध्ये दिसून येतात".
हे ही वाचा >> बीड पोलिसांनी अखेर खोक्या भोसलेला केली अटक, खोक्याला 'इथून' उचलला
राजकारणात सुरुवात कशी झाली?
"मी आयटी इंजीनिअर आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर खऱ्या अर्थाने माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. माझे वडील भारतीय सैन्यात आर्मी ऑफिसर कॅप्टन होते. त्यांनी 28 वर्ष देशाची सेवा केली. त्यामुळे समाजसेवेची आवड मला पहिल्यापासूनच होती. परंतु, लग्नानंतर माझे पती शुभम यांनी मला कार्य करण्याची प्रेरणा दिली. माझ्या सरपंचपदाच्या काळात गावाच्या विकासासाठी जे निर्णय घेतले, त्या काळात ते माझ्यासोबत उभे राहिले. ते नेमही म्हणतात समजासेवा ही एक जबाबदारी नाही, तर ती एक लोकांसाठी संधी आहे. तुला मिळालेला संधीचा उपयोग हा लोकांसाठी आणि समाजासाठी कसा करता येईल? त्या दृष्टीने काम कर", असंही निर्मला नवले म्हणाल्या.
सरपंच निर्मला नवले होतायत ट्रोल
@Savage Siyaram नावाच्या ट्वीटर यूजरने निर्मला नवले यांचा मुलाखतीचा व्हिडीओ ट्वीट करून त्यांना ट्रोल केलंय. 'A.I. चा वापर करून गावात सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसा', असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी नवलेंना तुफान ट्रोल केलंय. एका यूजरने म्हटलंय, लोकांनी Ai चा जोक करुन ठेवला आहे. दुसऱ्या यूजरने म्हटलं, 'हनुमान चालीसा मराठीतून असते की हिंदी भाषेमधून'. हिंदीत असते. A.I. चा कोड हिंदी भाषेत लिहीलाय सरपंच इंजिनिअर बाइंनी, असंही अन्य एका यूजरने म्हटलंय.
हे ही वाचा >> Honeymoon साठी बेडरुममध्ये गेल्यावरच प्रदीपच्या मोबाइलवर 'तो' मेसेज, अन् दोघांचा मृत्यू...
आयटी इंजीनिअर असतानाही राजकारणात एन्ट्री का केली?
मी हा विचार कधीच केला नव्हता. एक इंजीनिअर म्हणून चांगल्या कंपनीत जॉब मिळवायचा आणि काम करायचं, असाच निर्णय होता. परंतु, हे वेगळं फिल्ड आहे. मला लोकांसाठी काम करायची आवड पहिल्यापासूनच होती. मी या क्षेत्रात चांगल्या प्रकारे कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे, असंही