Manohara Joshi : 'राजीनामा द्या आणि...', बाळासाहेबांचा आदेश, जोशींनी का सोडलं होतं मुख्यमंत्रीपद?
Manohar Joshi Resignation chapter : मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला होता?
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
मनोहर जोशी होते पहिले ब्राह्मण मुख्यमंत्री
बाळासाहेब ठाकरेंनी का घेतला होता राजीनामा?
मनोहर जोशींच्या आयुष्यातील मोठी घटना
Manohar Joshi balasaheb Thackeray : 'तु्म्ही आता जेथेही असाल तिथे, सर्वकाही थांबवा. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करुन मला भेटायला या', असे आदेश बाळासाहेब ठाकरेंनी दिले आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला गेला. बाळासाहेबांनी एक आदेश देताच मनोहर जोशींनी आपलं मुख्यमंत्रीपद सोडलं. नेमकं काय घडलं होतं, तेच वाचा...
ADVERTISEMENT
बाळासाहेब ठाकरेंचा कडवट निष्ठावंत शिवसैनिक आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं 23 फेब्रुवारी रोजी निधन झालं. मनोहर जोशी यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरलीय.
मनोहर जोशी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत मुंबईच्या महापौरपदापासून ते राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि लोकसभेचे अध्यक्ष अशा घटनात्मक पदांवर काम केले. पण, त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा कायम चर्चेत असतो, तो म्हणजे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा.
हे वाचलं का?
जोशी ठरले पहिले ब्राह्मण मुख्यमंत्री
मनोहर जोशी यांचे मुख्यमंत्रीपद गेलं तेव्हाचा किस्सा राजकीय गप्पामध्ये येतोच. त्यावेळी नेमकं असं काय झालं होतं की, मनोहर जोशी यांना बाळासाहेंबांनी राजीनामा द्यायला लावला होता?
१९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तांतर झालं. जनतेनं शिवसेना-भाजप युतीला सत्तेसाठी जनादेश दिला. सरकार आल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केलं. महत्त्वाचे गोष्ट म्हणजे मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे पहिले ब्राह्मण मुख्यमंत्री ठरले.
ADVERTISEMENT
मनोहर जोशी मुख्यमंत्री होते,पण बाळासाहेबांचा आदेश शिरसावंद्य होता. त्यामुळेच बाळासाहेबांच्या एका आदेशावर मनोहर जोशींनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
ADVERTISEMENT
बाळासाहेबांनी मनोहर जोशींचा राजीनामा का घेतला?
1999 चा तो काळ होता. महाराष्ट्रात युतीची सत्ता येऊन चार वर्षांचा काळ लोटला होता. या काळात मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' आणि बाळासाहेबांच्या 'मातोश्री'त अंतर वाढले होते. या सगळ्यात पुण्यातील एका भूखंडाचं प्रकरण न्यायालयासमोर आलं.
मनोहर जोशी यांच्यावर स्वत:च्या जावयासाठी भूखंडाचे आरक्षण बदलल्याचा आरोप झाला. 1998 मध्ये मनोहर जोशींनी पुण्यातील शाळेसाठी राखीव असलेल्या भूखंडाचं आरक्षण बदलून ते जावई गिरीश व्यास यांच्या निकटवर्तीयांना दिल्याचं स्पष्ट झालं.
हेही वाचा >> मनोहर जोशींना दसरा मेळाव्यातून निघून जावं लागलं, नेमकी घटना काय?
या भूखंडाचं आरक्षण बदलून त्या जागी त्यांनी दहा मजली इमारत बांधल्याचंही समोर आलं. प्रकरण कोर्टात गेलं. मुख्यमंत्री मनोहर जोशींनी जावयाच्या फायद्यासाठी अशाप्रकारे शाळेच्या जागेचं आरक्षण बदलणं संतापजनक असल्याचं म्हणत सुप्रीम कोर्टानं जोशींना फटकारलं होतं. याचं प्रकरणानंतर बाळासाहेबांनी मनोहर जोशीचा तातडीनं राजीनामा घेतला.
बाळासाहेबांचं एक पत्र मनोहर जोशींना मिळालं. त्यात लिहिलेलं होतं की, 'तु्म्ही आता जिथेही असाल तिथे, कृपया सर्वकाही थांबवा. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करुन मला भेटायला या.'
हेही वाचा >> BMC क्लार्क ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री... असा होता मनोहर जोशींचा संघर्षमय प्रवास
मातोश्रीवरुन आलेला हा आदेश वाचल्यानंतर मनोहर जोशी यांनी तात्काळ राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मनोहर जोशी यांच्यानंतर नारायण राणे युती सरकारमध्ये मुख्यमंत्री झाले.
नारायण राणे यांनी आपल्या 'नो होल्ड्स बार्ड' या पुस्तकात मनोहर जोशी यांच्या राजीनाम्याआधीच्या काळाचं वर्णन केलं आहे. 'मनोहर जोशी स्वतःला वेगळं सत्ताकेंद्र मानत आहेत' अशी भावना साहेबांच्या मनात निर्माण झाल्याचं आपल्या लक्षात आलं, असं राणेंनी लिहिलेलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT