Praful patel Mumbaitak Baithak: अजित पवार-शरद पवार एकत्र येणार? प्रफुल पटेल म्हणाले...

साहिल जोशी

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल.
शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याची शक्यता किती आहे?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार-शरद पवारांबद्दल प्रफुल पटेल काय बोलले?

point

विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवणार?

point

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेला कोणती चूक केली?

Praful Patel News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे दोन पक्ष अस्तित्वात आले आहे. पण, महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याची चर्चा होत असते. त्यावर शरद पवार आणि अजित पवार यांच्या जवळचे नेते प्रफुल पटेल यांनी भाष्य केले आहे. (will Ajit pawar And Sharad Pawar together after Maharashtra assembly election 2024)

ADVERTISEMENT

प्रफुल पटेल हे मुंबई Tak बैठक कार्यक्रमात प्रफुल पटेल सहभागी झाले. या बैठकीत पटेल यांनी विधानसभेच्या जागावाटपासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

शरद पवार-अजित पवार एकत्र येणार?

पटेल म्हणाले की, "रेषा ओढली गेली आहे. एक राष्ट्रवादी महायुतीत, तर एक राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्ये आहे. पण, आम्ही महायुतीत राहणार, हे ठरलं आहे. शरद पवार हे माझे नेते आहेत. मी संसदेमध्ये बोललो आहे. संसदेमध्ये माझी त्यांची भेट होते असते."

हे वाचलं का?

हेही वाचा >> लाडक्या बहिणींना एक शेवटची संधी, नाहीतर अर्ज होणार बाद!

"माझी राजकारणाची स्टाईल संयमी आहे. मी संयमी राजकारण केले आहे. प्रतिष्ठा पाळून आम्ही राजकारण करत राहणारच आहोत. लोकांना माहिती प्रफुल पटेल संयमी राजकारणी आहेत", असे उत्तर प्रफुल पटेल यांनी दिला.

हेही वाचा >> सेल्फीचा नाद पडला भारी! पुण्यातील तरुणी कोसळली दरीत, व्हिडीओ बघा 

"१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकमेकांविरुद्ध लढले होते. आणि नंतर दोन्ही पक्ष एकत्र आले. पण, आता आम्ही महायुतीत आहोत. काल्पनिक प्रश्न आणि काल्पनिक उत्तर देण्यापेक्षा आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत", असे पटेल म्हणाले.  

ADVERTISEMENT

विधानसभेला किती जागा मागणार?

"आम्ही आकड्यांवर जाणार नाही. पण, आम्ही आमच्या मित्रपक्षाला मागणी केली आहे की, जिथे ज्याची ताकद, तिथे त्याला उमेदवारी दिली तर महायुतीच्या जागा जास्त आल्याशिवाय राहणार नाही. लोकसभेला शिवसेनेकडे १८ जागा होत्या. १४ खासदार शिंदेंकडे गेले होते. त्यामुळे विद्यमान खासदारांच्या जागा दिल्या गेल्या. आम्ही तिथे चुकलो. जिथे ज्यांची ताकद होती, त्यांना संधी दिली असती, तर लोकसभेचा निकाल वेगळा लागला असता", असे प्रफुल पटेल म्हणाले.  

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT