Santosh Deshmukh: तुमच्या पायखालची जमीन हादरून जाईल, संतोष देशमुखांचा पोस्टमार्ट्म रिपोर्ट आला समोर!

मुंबई तक

Santosh Deshmukh Murder: बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कशा पद्धतीने झाले याबाबत आता अत्यंत धक्कदायक माहिती समोर आली आहे. कारण त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आता समोर आला आहे.

ADVERTISEMENT

संतोष देशमुखांचा पोस्टमार्ट्म रिपोर्ट आला समोर!
संतोष देशमुखांचा पोस्टमार्ट्म रिपोर्ट आला समोर!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अखेर संतोष देशमुखांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर

point

संतोष देशमुखांना तब्बल 3 तास सुरू होती मारहाण

point

पोस्टमार्टम रिपोर्टमधून हादरवून टाकणाऱ्या गोष्टी आल्या समोर

Santosh Deshmukh Post Mortem Report: योगेश काशिद, बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळेस काढलेले फोटो हे चार्जशीटमधून समोर आल्यानंतर अवघा महाराष्ट्र हा हादरून गेला. ज्यामुळे राज्यात संपाची लाट निर्माण झाली. ज्यानंतर मंत्री धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला. असं असताना आता संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल देखील चार्जशीटमधून समोर आला आहे. संतोष देशमुख यांना किती निर्घृण पद्धतीने मारण्यात आलं हेच या अहवालातून समोर येत आहे. 

संतोष देशमुखांचा पोस्टमार्टम रिपोर्ट पाहून तुम्हीही जाल हादरून

खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच संतोष देशमुख यांच्या शरीराच्या बहुतांशी भागावर अत्यंत गंभीर स्वरूपाच्या अशा जखमा आहेत. संतोष देशमुख यांना एवढ्या अमानुषपणे मारहाण करण्यात आली की, त्यांचं अवघं शरीर हे काळं-निळं पडलं होतं. त्यांच्या नाकातून रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण झाल्याचे अहवालामधून समोर आलं आहे.

हे ही वाचा>> सहजासहजी नाही झाला धनंजय मुंडेंचा राजीनामा, ही आहे Inside स्टोरी.. क्रोनोलॉजी पाहा!

पोस्टमार्टम अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

  • सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला असून त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे हे आता उजेडात आले आहेत.
  • मारहाणीची तीव्रता दाखवणारा अत्यंत धक्कादायक शवविच्छेदन अहवाल हा समोर आला आहे.
  • सरपंच संतोष देशमुख यांना अत्यंत हाल-हाल करून मारण्यात आले. संतोष देशमुख यांची हत्या ही जबर मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • संतोष देशमुख यांच्या नाकातून रक्त येईपर्यंत मारहाण करण्यात आल्याचं अहवालात नमूद करण्यात आला आहे.
  • जबर मारहाणीमुळे देशमुख यांचे संपूर्ण शरीर काळनिळं पडल्याचे अहवालात नमूद
  • संतोष देशमुख यांच्या शरीरावर बहुतांश भागात गंभीर स्वरूपाच्या जखमा.
  • संतोष देशमुख यांच्या हनुवटी, कपाळ दोन्ही गालावर गंभीर स्वरूपाच्या जखमा.
  • देशमुख यांच्या पोटावर बेदम मारहाण केल्याने नाकातून रक्तस्त्राव
  •  
  • याशिवाय छाती, गळ्यावर आणि गळ्याच्या समोर अत्यंत गंभीर जखमा 
  • छातीवर उजव्या आणि डाव्या बाजूला तसेच बरगड्यांवर गंभीर स्वरूपाची मारहाण ज्यामुळे अंतर्गत जखमा.
  • संतोष देशमुख यांच्या डाव्या खांद्यावर मोठ्या जखमा. तसेच दंड., कोपरा, मनगट, हाताच्या मुठीवरही गंभीर स्वरूपाच्या जखमा.
  • संतोष देशमुख यांना करण्यात आलेल्या मारहाणीमुळे हात काळानिळा पडला असून त्यांच्या पोटऱ्याही काळ्या-निळ्या पडल्या आहेत.
  • संतोषथ देशमुख यांच्या डाव्या खांद्यावर गंभीर स्वरूपाच्या मारहाणीच्या जखमा.
  • मांडी, गुडघा, नडगी आणि बरगड्यांवर बेदम मारहाण
  • गंभीर स्वरूपाच्या मारहाणीमुळे संतोष देशमुख यांची पाठ काळी निळी
  • संतोष देशमुख यांना केलेल्या जबर मारहाणीमुळे त्यांच्या शरीरात जवळपास दोन ते अडीच लिटर रक्त साचलं होतं.
  • संतोष देशमुख यांना अडीच ते तीन तास जबर मारहाण झाल्याची अहवालातून माहिती.

हे ही वाचा>> Santosh Deshmukh यांची हत्या ते धनंजय मुंडेंचा राजीनामा, महाराष्ट्राला हादरवणारं नेमकं प्रकरण काय?

कोर्टासमोर 1400 पानांचं चार्जशीट

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ सीआयडीने 1400 पानांच्या दोषारोप पत्रामध्ये सादर केले आहेत. हे फोटो देखील समोर आले. मात्र, आता संतोष देशमुख यांच्या किती क्रूरतेने मारण्यात आलं त्याचा शवविच्छेदन अहवालच समोर आला आहे. 

चार्जशीटमध्ये शवविच्छेदन अहवालाबाबतची माहिती देण्यात आली आहे. गंभीर स्वरूपाच्या मारहाणीमुळे जवळपास दोन ते अडीच लिटर रक्त हे संतोष देशमुख यांच्या शरीरामध्ये साचले होते. संतोष देशमुख यांना जवळजवळ अडीच ते तीन तास मारहाण सुरू होती या गंभीर मारहाणीमुळेच संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्याची माहिती अहवालामधून समोर आली आहे.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp