Rajan Salvi “मला अटक करा, जेलमध्ये टाका, पण बायको…”, ठाकरेंच्या आमदाराचा दाटला कंठ

मुंबई तक

ADVERTISEMENT

thackeray group mla rajan salvi is emotional after the anti-corruption department action
thackeray group mla rajan salvi is emotional after the anti-corruption department action
social share
google news

Shiv sena: ठाकरे गटाने जनता न्यायालय भरवत महापत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर कायद्याच्या भाषेत जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर काही तासातच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे सूरज चव्हाण आणि आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला. आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti-corruption Department) अधिकारी त्यांच्या घरी जाण्याआधीपासूनच त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत असल्यामुळेच ही कारवाई होते आहे. मात्र या कारवाईला मी घाबरत नाही. त्यांना जे करायचे आहे ते करू शकतात. कारण कर नाही त्याला डर कशाची असंही त्यांनी बोलून दाखवले. मात्र त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची शक्यता दिसल्यानंतर मात्र ते भावूक झाले. यावेळी ते म्हणाले की, शिंदे गटासोबत गेले नाही म्हणून तुम्ही राग काढला हे समजू शकतो मात्र तुम्ही माझ्यावर राग काढा, अटक करा, जेलमध्ये टाका. पण तुम्ही पत्नी आणि मोठ्या मुलावर गुन्हा दाखल करत असाल तर जनता तुम्हाला सोडणार नसल्याचे म्हणत त्यांचा कंठ दाटून आला होता.

ADVERTISEMENT

पत्नी-मुलावर गुन्हा

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून साडेतीन कोटी रुपयांच्या बेनामी संपत्ती प्रकरणी कारवाई करण्यात आली. त्यांच्या संपत्तीमध्ये 118 टक्के जास्त रक्कम ही जास्त असल्याचा आरोप एसीबीकडून करण्यात आला आहे. त्या चौकशीसाठीच त्यांच्या मुलावर आणि बायकोवरही गुन्हा दाखल केला गेला.

मला तुरुंगात टाका

राजन साळवी यांच्यावर कारवाईचा बडगा उचलल्यानंतर मात्र ते भावूक होतं, गुन्हा जर मी केला असेल तर मला अटक करा, मला तुरुंगात टाका. मात्र माझ्या मुलावर, बायकोवर का गुन्हा नोंद करताय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी आपल्या भावाच्या घरीही या पथकाकडून का चौकशी करण्यात येते आहे ते कळत नाही आणि ही खूप खेदाची गोष्ट असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Maratha Reservation: जरांगे पाटलांनी सरकारला ठणकावून सांगितलं ‘मुंबईत गोळ्या झेलण्यास…’

परिणाम भोगावे लागतील

यावेळी त्यांनी शिंदे गटाला थेट इशारा देत सांगितले की, आज तुम्ही माझ्यावर कारवाई करत असला तरी राजन साळवी काय आहे आणि कसा आहे हे जसं माझ्या कुटुंबाला माहिती आहे. तसेच ते पक्षाला आणि जनतेलाही माहिती आहे. तशीच गोष्ट मतदारसंघालाही सगळी माहिती असून ज्या प्रमाणे माझ्यासह माझ्या मुलावर आणि पत्नीवर ज्या प्रमाणे गुन्हा दाखल होण्याचा प्रकार केला आहे. त्या सगळ्याचे परिणाम भविष्यात सरकारला भोगावे लागतील असंही त्यांनी यावेळी सांगितले.

माझ्या पाठीशी महाराष्ट्र

एसीबीकडून गुन्हा दाखल झाला आहे याचा अर्थ मला अटक होणारच आहे. मात्र या अटकेला मी घाबरत नाही, कारण मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, आणि आता उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे सांगत तुझ्या पाठीशी संपूर्ण शिवसेना असून महाराष्ट्रही आहे. त्यामुळे या कारवाईनं मी घाबरलो नाही मात्र पत्नी आणि मुलावर गुन्हा नोंद केल्यामुळे मात्र मला या गोष्टीचा खेद व्यक्त करावा वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘हा जनता न्यायालयाचा इम्पॅक्ट’, चव्हाण-साळवींच्या कारवाईवरून राऊतांनी तोफ डागली

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT