‘दुसऱ्यांच्या घरात धुणीभांडी…’ ठाकरेंची Cm शिंदेंवर जोरदार टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray criticizes Chief Minister Eknath Shinde for farmers selling organs
Uddhav Thackeray criticizes Chief Minister Eknath Shinde for farmers selling organs
social share
google news

Uddhav Thackeray:‘स्वतःच्या राज्यातील शेतकऱ्यांची घरं उद्धवस्त होत असताना, दुसऱ्याच्या घरात दुसऱ्यांची धुणीभांडी करायला जाणारी ही लोकं, राज्य कारभार करायला नालायक असल्याची जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर केली आहे. हिंगोली, वाशिममधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बँकेची कर्ज (Bank Loan) फेडण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी आपले अवयव विकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना काल काही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांची व्यथा ऐकून घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज उद्धव ठाकरे यांच भेट घेतली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

ADVERTISEMENT

पंचनाम्याचे खेळ थांबवा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना सरकारचा भोंगळ कारभारावरून जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी सरकारकडून चाललेल्या पंचनाम्यावरून त्यांना धारेवर धरले आहे. सरकारने चालवलेल्या या पंचनाम्याचे खेळ थांबवून राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

हे ही वाचा >> ‘राजीनामा परत घेण्यासाठीचं आंदोलन पवारांच्याच आदेशावरून’, अजित पवारांचा खळबळजनक खुलासा

नालायक शब्दाचा राग

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. त्यासारखीच आताही कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका करताना मागील त्यांनी नालायक हा शब्द वापरला होता. त्याच शब्दाची पुनरावृत्ती करत त्यांनी आजही पुन्हा एकदा त्यांनी नालायक शब्दाचा उच्चार केला. त्यांना नालायक शब्दाचा राग आला आहे मात्र त्यांच्यासाठी मग कोणता शब्द वापरायचा असा सवालही त्यांनी यावेळी केला.

हे वाचलं का?

फसल योजना फसवी

प्रधानमंत्री फसल योजनेवरून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले आहे. या फसल योजनेमध्ये मोठा घोटाळा असल्याचे सांगत आपर्यंत किती शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळाला असल्याचा सवाल त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे. या सरकारने शेतकऱ्यांना फक्त अश्वासन देण्यापलिकडे काही दिले नाही. म्हणून आजच्या या शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ आली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

अवयव विकण्याचा विचार

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनाही दिलासा देत तुम्ही अवयव विकण्याचा विचार करू नका, आत्महत्येचाही कधी विचार करू नका म्हणत तुम्हाला जी मदत लागणार आहे ती मदत करण्यासाठी शिवसेना तयार असल्याचेही त्यांनी अश्वासन दिले आहे. कारण हिंगोली, वाशिममधून आलेल्या शेतकऱ्यांनी आपले अवयव विकण्याचा विचार केला आहे. 75 हजार लिव्हर, 90 हजार रुपयेमध्ये किडनी, 25 हजार रुपये मध्ये डोळे ठेवले असल्याची व्यथा शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर सांगितली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Iqbal Singh Chahal : हिशोब तर द्यावाच लागेल! सोमय्यांचा BMC आयुक्तांवर गंभीर आरोप

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT