‘मविआ’चा प्लॅन ठरला; भाजप-शिवसेना युतीला ३ महिन्यांत फोडणार घाम?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Mahavikas Aaghadi public rally :

ADVERTISEMENT

मुंबई : विधानपरिषद निवडणुका आणि पाठोपाठ झालेली विधानसभेची पोटनिवडणूक यात मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) कमालीची सक्रिय झालेली दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या पुढील ३ महिने राज्यातील प्रमुख शहरांमध्ये ७ जाहीर सभा पार पडणार आहेत. या सभांचा कार्यक्रम आज (रविवारी) घोषित करण्यात आला. या सभांना शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. (Uddhav Thackeray will do public rally’s along with Sharad Pawar, Ajit Pawar and Nana Patole)

असा आहे महाविकास आघाडीचा सभांचा कार्यक्रम :

  • २ एप्रिल २०२३- छत्रपती संभाजीनगर

हे वाचलं का?

  • १६ एप्रिल २०२३ – नागपूर

  • १ मे २०२३ – मुंबई

  • ADVERTISEMENT

  • १४ मे २०२३ – पुणे

  • ADVERTISEMENT

  • २८ मे २०२३ – कोल्हापूर

  • ३ जून २०२३ – नाशिक

  • १८ जून २०२३ – अमरावती

  • महाविकास आघाडीच्या या नेत्यांवर खास जबाबदारी 

    • छत्रपती संभाजीनगर – अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • पुणे – अजित पवार, राष्ट्रवादी

    • कोल्हापूर – सतेज पाटील, काँग्रेस

    • मुंबई – आदित्य ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • नाशिक – छगन भुजबळ, राष्ट्रवादी 

    • नागपूर – सुनील केदार, काँग्रेस

    • अमरावती – यशोमती ठाकूर काँग्रेस

    Sheetal Mhatre: ‘आम्ही त्यांना फोडून काढतो’, व्हिडीओवरून रुपाली पाटलांचा चढला पारा

    १५ मार्चला ठरणार मैदानं :

    दरम्यान, या सभांची शहर आणि तारखा ठरल्या असून आता मैदान इतर गोष्टींच्या चर्चेसाठी 15 मार्चला महाविकास आघाडी नेत्यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी हजर राहणार आहेत.

    बच्चू कडू खरं बोलले की खोटं? आसाममध्ये कुत्र्याचं मांस खातात का?

    खेडच्या सभेने दिली कल्पना?

    निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्यानंतर ४ मार्च रोजी ठाकरे गटाकडून पहिली जाहीर सभा खेड येथे घेण्यात आली. या सभेला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. या सभेला झालेली गर्दी पाहता आणि मागील काही दिवसांत महाविकास आघाडीला एकत्रितपणे मिळालेले यश लक्षात घेऊन अशा काही सभा महाविकास आघाडीने एकत्रित घ्याव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. तसंच आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता, महाविकास आघाडीकडून घेण्यात येणाऱ्या या सभा महत्वपूर्ण ठरू शकतात, असंही बोललं जात आहे.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT