Ketaki Chitale: 'डोक्यात हवा गेलीय.. मी तीन चाकी रिक्षा चालवायला निघतो...', चितळे शिंदेंवर संतापली; फडणवीस-पवारांनाही बरंच बोलली!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ketki Chitale Angry on BJP Mahayuti: अभिनेत्री केतकी चितळेने एक व्हिडीओ जारी करून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. वक्फ बोर्डाला 10 कोटींची आर्थिक मदत दिल्यानंतर चितळेने त्यावर संताप व्यक्त केला.

social share
google news

Ketaki Chitale CM Eknath Shinde: मुंबई: मराठी अभिनेत्री केतकी चितळे ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा अडचणीत आली आहे. एवढंच नव्हे तर तिला तुरुंगातही जावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा केतकीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने महायुती सरकारवर संताप व्यक्त केला आहे. तसंच तुम्हाला हिंदू नकोएत का? असा सवाल केतकीने विचारला. एवढ्यावरच न थांबता तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर सडकून टीका केली. (marathi actress ketaki chitale angry on cm shinde dcm devendra fadnavis ajit pawar and bjp mahayuti maharashtra government on waqf board aid)

राज्यातील महायुती सरकारने वक्फ बोर्डाला 10 कोटींचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हणत केतकीने सोशल मीडियावर अत्यंत तावातावाने सरकारवर टीकेची झोड उठवली. 'अरे निर्लज्ज माणसांनो, तुम्ही बधीर झाला आहात का?' अशा शब्दांचा वापर करत केतकीने राज्यातील सरकारवर टीका केली आहे. 

यावेळी केतकी चितळे हिने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. या तीनही नेत्यांवर केतकीने बराच संताप व्यक्त केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

पाहा केतकी चितळे नेमकं काय म्हणाली... 

 

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT