Mahendra Thorve : "राष्ट्रवादीकडून पाठीत वार करण्याचे काम सुरू", महायुतीत संघर्ष
Maharashtra Vidhan Sabha : शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Vidhan Sabha : शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Mahendra Thorv Maharashtra Vidhan Sabha : "मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीचे काम केलेले नाही. आमच्या उमेदवाराचे काम केलेले नाही. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आम्ही निवडून आणला, पण भविष्यात महायुतीचा धर्म पाळला गेला पाहिजे", असे म्हणत शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. थोरवे यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवल्याने रायगड जिल्ह्यात महायुतीतील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. (Mahendra Thorve has alleged that Ajit Pawar's NCP did not help the Shiv Sena candidate in the Lok Sabha elections)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुती धर्म पाळला नाही, असे मोठे विधान शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले आहे. रायगडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना थोरवे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलची नाराजी बोलून दाखवली.
"रायगड जिल्ह्यात सर्व आमदारांनी प्रामाणिकपणे काम केले म्हणून ऐतिहासिक विजय मिळवता आला. पण, हेच मावळमध्ये राष्ट्रवादीच्या काँग्रेसने असे केलेले नाही. राष्ट्रवादी नक्कीच आमच्या उमेदवाराचे काम केलेले नाही. आम्ही आधीही सांगितलं आहे", असे आमदार थोरवे म्हणाले.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
"मी भरत गोगावलेंना सांगितले की, आपण, सुनील तटकरेंना निवडून आणलं. पण, जिल्ह्यात या नेत्यांनी एकत्र येऊन महायुतीचा धर्म जिल्ह्यात पाळला पाहिजे. कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार घोषित केला आहे", असे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले.
महायुती असताना पाठीत वार करणे सुरू झालंय -महेंद्र थोरवे
आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, "महायुतीने असताना सुद्धा अशा पद्धतीने लंपडाव, पाठीत वार करण्याचे काम सुरू झालेले आहे. महाड मतदारसंघ आम्ही कसाही खेचून आणूच, पण श्रीवर्धन मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. हे विसरता कामा नये. चार वेळा या मतदारसंघातून शिवसेनेचा आमदार निवडून गेलेला आहे", असेही थोरवे म्हणाले.
ADVERTISEMENT