बंडखोर आमदारांच्या मुंबईतल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी काय म्हटलंय?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

२१ जूनला महाराष्ट्रात राजकीय बंड झालं. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बंडखोर आमदार आधी सुरतला गेले, त्यानंतर गुवाहाटीला गेले. गुवाहाटीहून गोव्याला गेले आणि गोव्याहून शनिवारी रात्री मुंबईत परतले. त्यानंतर या सगळ्या आमदरांसह भाजपच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीच्या आधी भाजप-शिवसेना युतीचा विजय असो या घोषणा देण्यात आल्या. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले.

ADVERTISEMENT

आज महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी शिवसेनेत दोन व्हीप जारी झाले आहेत. ही निवडणूक अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे. बंड केल्यानंतर शिवसेनेचे आमदार पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले आहेत. ते आज विधानसभेत जाऊन अध्यक्ष निवडणार आहेत. गोव्याहून हे सगळे आमदार मुंबईत आले. त्यावेळी बैठकही झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपली भूमिका मांडली.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

हे वाचलं का?

भाजप-शिवसेना वेगळी होती असं इतकी वर्षे कधी वाटलं नाही. मधल्या काळात थोडं दूर गेल्यासारखं वाटलं. पण आता आपण पुन्हा एकत्र आलो आहोत. आपला परिवार एक झाला आहे. आपल्यासोबत बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन हे सैनिक पुढे आले आहेत त्यांना बळ देणं ही आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्रात आपल्याला एकत्र वाटचाल करायची आहे. महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलंय?

ADVERTISEMENT

आज खऱ्या अर्थाने भाजप-सेना युतीचं सरकार आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वीर सावरकर यांचा अपमान, दाऊद संबंधाचा आरोप झालेल्या मंत्र्याचा बचाव, हे सारे अस्वस्थेचे विषय बनत चालले होते. शिवसेनेचे अधिक नुकसान होतेय हे पाहणे त्रासदायक होते. नेतृत्वाला सांगण्याचे प्रयत्न खूप झाले, पण दुर्देवाने त्यात यश आले नाही, म्हणून आजची स्थिती निर्माण झाली.

ADVERTISEMENT

आपण मतदारांना न्याय देऊ शकलो नाही, तर आपल्या आमदारकीचा उपयोग काय? हाच सर्वांचा विचार होता. येत्या वर्षभरात अडीच वर्षाच्या कामाचा अनुशेष भरून काढू, देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत आहेतच. त्यांना कामाचा अनुभव प्रचंड आहे. कठीण कामं सोपी कशी करायची हे त्यांना ठाऊक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री होण्याची संधी त्यांनी दिली. त्यांचा आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा सुद्धा मी आभारी आहे. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT