Asia Cup : भारत-पाकिस्तान भांडण मिटलं, ‘या’ मैदानावर येणार आमने सामने
हायब्रिड मॉड़ेलवर आशिया कप खेळवला जाणार आहे. या हायब्रिड मॉड़ेलनुसार दोन देशात ही स्पर्धा खेळवण्याचा विचार सूरू आहे. या प्रस्तावावर आता येत्या 13 जुन रोजी म्हणजेच मंगळवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
यंदाच्या वर्षी आशिया कप 2023 (Asia Cup) पाकिस्तानमध्ये खेळवला जाणार होता. मात्र भारताने (Team India) आशिया कपसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. या नकारानंतर पाकिस्तानने देखील आडमुठेपणाची भूमिका घेतली होती. त्यामुळे आशिया कपवरून मोठा वाद पेटला होता. मात्र या वादावर आता पडदा पाडण्याची शक्यता आहे. कारण आता हायब्रिड मॉड़ेलवर आशिया कप खेळवला जाणार आहे. या हायब्रिड मॉड़ेलनुसार दोन देशात ही स्पर्धा खेळवण्याचा विचार सूरू आहे. या प्रस्तावावर आता येत्या 13 जुन रोजी म्हणजेच मंगळवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. (asia cup 2023 venue confirmed pakistan and srilanka will host tournament)
ADVERTISEMENT
मीडिया रिपोर्टनुसार, आशियाई क्रिकेट परिषद (ACC) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB)प्रस्तावित केलेल्या हायब्रिड मॉडेलला मान्य़ता देणार आहे. मंगळवारी 13 जूनला जय शहा यांच्या उपस्थितीत या संदर्भातील घोषणा होण्याची शक्यता आहे. हायब्रिड मॉडेलला स्विकृती मिळाल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट टीम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार आहे. यासोबतच पाकिस्तानला अहमदाबादमध्ये सामना खेळण्यास कोणतीच समस्या असणार नाही आहे. दरम्यान हायब्रिड मॉडेलनुसार 13 मधून 4 सामने पाकिस्तानमध्ये (Pakistan) खेळवले जाणार आहे. तसेच भारत-पाकिस्तानचे दोन सामने आणि इतर सामने श्रीलंकेच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. आशिया कपचे आयोजन 1 ते 17 सप्टेंबर दरम्यान आयोजित होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : India vs Australia, WTC Test : भारताचे विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा भंगले!
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) सीईओ ज्योफ अल्लार्डिस आणि अध्यक्ष ग्रेग बार्कले पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांना भेटण्यासाठी कराचीला गेले, तेव्हा वर्ल्ड़कप स्पर्धेसाठी पाकिस्तान कोणतीही अट घालणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. आशिया चषकासाठी ‘हायब्रीड मॉडेल’ सर्वात व्यावहारिक दिसते कारण ते कोणत्याही अटीशिवाय एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तानला भारतात जाण्याचा मार्ग मोकळा करेल. एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक पुढील आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर होण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
यंदाचा आशिया कप (Asia Cup) हा वनडे स्वरूपात खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ असे संघ सहभागी होणार आहेत. एकाच गटात भारत, नेपाळ आणि पाकिस्तानचा समावेश आहे. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात राहतील. दोन्ही गटातील प्रत्येकी दोन संघ सुपर 4 मध्ये पोहोचतील. त्यानंतर सुपर 4 मध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने एकूण 6 सामने खेळवले जातील. यानंतर दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील आणि त्यांच्यामध्ये विजेतेपदाचा सामना खेळला जाईल. अशाप्रकारे आशिया चषक 2023 मध्ये अंतिम सामन्यासह एकूण 13 सामने खेळवले जातील.
हे ही वाचा : WTC Final : अजिंक्य रहाणेचं शतक! कसोटीत घेतल्या 100 कॅच
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT