ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाक सामना ‘या’ दिवशी

मुंबई तक

ADVERTISEMENT

icc odi world cup 2023 schedule announced india vs pakistan one day world cup date venue
icc odi world cup 2023 schedule announced india vs pakistan one day world cup date venue
social share
google news

Icc odi World cup 2023 Schedule : क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागून राहिलेल्या वनडे वर्ल्ड कपचे वेळापत्रक आयसीसीने आज जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार 5 ऑक्टोंबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान हा वनडे वर्ल्ड़ कप भारतात रंगणार आहे. विशेष म्हणजे याआधी 1987, 1996 आणि 2011 साली भारताने वनडे वर्ल्ड कपचे संयुक्त यजमानपद भूषवले होते. पण क्रिकेट इतिहासात प्रथमच संपूर्ण वर्ल्ड कप हा भारतात खेळवला जाणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या फॅन्सना वर्ल्ड कप विजयाची उत्सुकता लागली आहे. तसेच प्रत्येक आयसीसी स्पर्धेत भारत-पाक (Ind vs Pak) आमने सामने येत असतात. त्यामुळे भारत-पाकिस्तान नेमके कधी भिडणार आहेत, हे जाणून घेऊयात. (icc odi world cup 2023 schedule announced india vs pakistan one day world cup date venue)

ADVERTISEMENT

आयसीसीने 13 व्या वनडे वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार 46 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. या वर्ल्ड कपची सुरुवात गतविजेता इंग्लंड आणि गतवर्षीचा उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना 5 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरूद्ध रंगणार आहे. तर बहुप्रतिक्षित आणि कॉंटे की टक्कर वाला भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. या वर्ल्ड कपचा फायनल सामना हा नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे.

हे ही वाचा : ICC Test Ranking : टॉप 10 सोडाच! टेस्ट रॅकींगमध्ये विराट कोहलीने गमावलं स्थान

फायनल-सेमी फायनल सामने कधी रंगणार?

2019 च्या वनडे वर्ल्ड कपप्रमाणे यंदा सुद्धा सामने राऊंड रॉबिन लीगप्रमाणे खेळवण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक संघ एक दुसऱ्या संघाविरूद्ध एक-एक सामने खेळणार आहे. यानंतर ग्रुज स्टेजमध्ये टॉप चार संघ सेमी फायनलमध्ये आमने सामने येतील. पहिला सेमी फायनल सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. तर दुसरा सेमी फायनल सामना हा 16 नोव्हेंबर रोजी कोलकत्ताच्या ईडन गार्डन मैदानावर रंगणार आहे. त्यामुळे जर टीम इंडियाने सेमी फायनलसाठी क्वालिफाय केल्यास त्यांचा सामना मुंबईत खेळवला जाणार आहे.

हे वाचलं का?

टीम इंडियाचे ‘या’ दिवशी सामने

8 ऑक्टोबर विरूद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर विरूद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
15 ऑक्टोबर विरूद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर विरूद्ध बांग्लादेश, पुणे
22 ऑक्टोबर विरूद्ध न्युझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर विरूद्ध इग्लंड, लखनऊ
2 नोव्हेंबर विरूद्ध क्वालिफायर 2, मुंबई
5 नोव्हेंबर विरूद्ध साऊथ अफ्रीका, कोलकत्ता
11 नोव्हेंबर विरूद्ध क्वालिफायर 1 , बंगळुरू

अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस?

पहिला सेमी फायनल सामना बुधवारी 15 नोव्हेंबर रोजी मुंबईत आणि दुसरा सेमी फायनल दुसऱ्य़ा दिवशी 16 नोव्हेंबरला कोलकात्तात रंगणार आहे. या दोन्ही सेमी फायनलसाठी एक राखीव दिवस ठेवला आहे. तर फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 19 नोव्हेंबरला रंगणार आहे. या फायनल सामन्यासाठी 20 नोव्हेंबर हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

आठ संघ क्वालिफाय

वर्ल्ड कपमध्ये 10 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत यजमान भारताला थेट प्रवेश मिळाला आहे. तर अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इग्लंड, बांग्लादेश, न्युझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रीका या संघाना 2020-23 आयसीसी क्रिकेट विश्व कप सुपर लीगद्वारे स्पर्धेसाठी क्वालिफाय केले आहे. त्यानुसार आतापर्यंत 8 संघ वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय झाले आहेत, तर इतर दोन संघ क्वालिफाय होणे बाकी आहे. या दोन संघासाठी जिम्बाब्वेमध्ये सामने सुरु आहेत. आता हो दोन संघ कोणते क्लालिफाय होतील याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा :  Team India Squad West Indies Series : टीम इंडियाची घोषणा, संघात मोठे फेरबदल

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT