ICC World Cup Playing 11 : कमिन्सला डच्चू, टीम इंडियाचा डंका! ‘या’ 6 भारतीय ICC च्या संघात

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

only the captain of the champion Australian team, Pat Cummins, has been kept out of it. ICC has made Rohit Sharma the captain of its playing-11.
only the captain of the champion Australian team, Pat Cummins, has been kept out of it. ICC has made Rohit Sharma the captain of its playing-11.
social share
google news

ICC World Cup Playing 11 players name: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2023 च्या विश्वचषक स्पर्धेतील प्लेइंग-11 संघ जाहीर केला आहे. सुमारे दीड महिना चाललेल्या या विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरीच्या जोरावर आयसीसीने आपल्या प्लेइंग-11 मध्ये 6 भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे.

ADVERTISEMENT

आश्चर्याची बाब म्हणजे विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. आयसीसीने रोहित शर्मावर प्लेइंग-11 च्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली आहे.

हे ही वाचा >> Ind vs Aus : विश्व कप विजेत्या ऑस्ट्रेलियावर पडला पैशाचा पाऊस, टीम इंडियाला किती कोटी मिळाले?

रोहित शर्माशिवाय इतर 5 भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली, के.एल. राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेलॉर्ड कोएत्झी याला 12 वा खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे.

हे वाचलं का?

पाकिस्तान-इंग्लंडला झटका, प्लेईंग 11 मध्ये नाही एकही खेळाडू

भारतीय खेळाडूं व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-सलामीवीर क्विंटन डी कॉकलाही या प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले आहे. तर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघातील केवळ दोन खेळाडूंना प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले आहे. यात एक आहे अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि दुसरा फिरकीपटू अॅडम झाम्पा.

हे ही वाचा >> Rohit Sharma : ‘खरं सांगायचं तर…’, रोहितने सांगितल्या चुका, कुणाला ठरवलं जबाबदार?

याशिवाय न्यूझीलंडच्या डॅरेल मिशेलला मधल्या फळीत स्थान मिळाले आहे. गोलंदाजीत श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंकाची प्लेईंग-11 मध्ये निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, नेदरलँड आणि बांगलादेशच्या एकाही खेळाडूला आयसीसी वर्ल्ड कप प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेले नाही.

ADVERTISEMENT

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

ADVERTISEMENT

आयसीसीने वर्ल्डकप प्लेइंग-11 मध्ये कोण कोण?

क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका), रोहित शर्मा (कर्णधार-भारत), विराट कोहली (भारत), डॅरेल मिशेल (न्यूझीलंड), केएल राहुल (भारत), ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), रवींद्र जडेजा (भारत), जसप्रीत बुमराह (भारत), दिलशान मदुशंका (श्रीलंका), अॅडम झाम्पा (ऑस्ट्रेलिया) आणि मोहम्मद शमी (भारत).

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT