Odi World Cup 2023 : वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, ‘ही’ मागणी फेटाळली

मुंबई तक

ADVERTISEMENT

ind vs pak pakistan cricket board pcb request for odi world cup 2023 venue switch turned down
ind vs pak pakistan cricket board pcb request for odi world cup 2023 venue switch turned down
social share
google news

वनडे वर्ल्ड कप 2023 ला येत्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्य़ात सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपचे यजमान पद भारताकडे असणार आहे. आता वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तान मोठा धक्का बसला आहे.पाकिस्तान संघाने वर्ल्ड कप संदर्भात आयसीसी आणि बीसीसीआयकडे एक मागणी केली होती. ही मागणी आता आयसीसी आणि बीसीसीआयने फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. (ind vs pak pakistan cricket board pcb request for odi world cup 2023 venue switch turned down)

ADVERTISEMENT

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (pakistan cricket board) आयसीसी (ICC) आणि बीसीसीआयकडे (BCCI) एक मागणी केली होती. या मागणीत त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरूद्ध होणाऱ्या सामन्यांची मैदाने आपापसात बदलण्याची मागणी केली होती. खरं तर पाकिस्तानला (pakistan)ऑस्ट्रेलियाविरूद्ध बंगळुरूत सामना खेळायचा आहे, तर अफगाणिस्तान विरूद्धचा सामना चेन्नईत खेळायचा आहे. त्यामुळे रीपोर्टनुसार ही दोन्ही ठिकाणे आपापसात बदलण्याची मागणी पाकिस्तान बोर्डाने आयसीसी आणि बीसीसीआयकडे केली होती. मात्र क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान बोर्डाने केलेली ही मागणी फेटाळण्यात आली आहे. आयसीसी आणि बीसीसीआयची मंगळवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय़ घेऊन तो पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सांगितला आहे.

हे ही वाचा : ‘…तर भारतात वर्ल्डकपही खेळणार नाही’, जावेद मियादादने बीसीसीआयला डिवचलं

यंदा वर्ल्ड कपची (odi world cup 2023) सुरुवात 5 ऑक्टोंबरपासून होणार आहे. पहिला सामना अहमदाबादमध्ये गतविजेचा इग्लंड आणि गतवेळचा उपविजेता न्युझीलंड यांच्यात रंगणार आहे. तर टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये रंगणार आहे. पाकिस्तान संघ आपला पहिला सामना 6 ऑक्टोबरला हैद्राबादला क्लालिफायर टीम विरूद्ध खेळणार आहे.

हे वाचलं का?

पाकिस्तानच्या बोर्डाने (pakistan cricket board) सामन्याचे ठिकाण बदलण्याचे कोणतेही ठोस कारण सांगितले नाही आहे. त्यामुळेच आय़सीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तानचा हा प्रस्ताव फेटाळला आहे. स्पर्धा खुपच जवळ आली आहे,त्यामुळे सामन्यांचे ठिकाण बदलता येणार नाही. तसेच सामन्यांचे ठिकाण बदलण्याचे संपूर्ण अधिकार भारताकडे आहेत, पण यासाठी आयसीसीच्या मंजूरीची आवश्यकता गरजेची असते.

‘या’ परिस्थितीतच मैदाने बदलतात

तसेच वर्ल्ड कपमध्ये मैदाने तेव्हाच बदलली जातात, जेव्हा खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत असतो. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे, मैदान आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी योग्य मानले जात नसेल, त्यावेळेस मैदाने बदलली जातात. पण पाकिस्तानच्या मागणीत अशीच कोणतीच गोष्ट नव्हती. त्यामुळे पाकिस्तान बोर्डाची मागणी फेटाळण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : ODI World Cup 2023 : ‘या’ दिवशी भिडणार भारत पाकिस्तान, वेळापत्रक आलं समोर

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT