टीम इंडियाला दिलासा! Asia Cup पूर्वी जसप्रीत बुमराह, के एल राहुल मैदानात करणार वापसी
जसप्रीत बुमराह आणि के एल राहुल सारखे स्टार खेळाडू दुखापतीतून सावरून मैदानात वापसी करण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आशिया कपमध्ये टीम इंडियाची ताकद वाढणार आहे. यामुळे टीम इंडियाला दिलासा मिळणार आहे.
ADVERTISEMENT
टीम इंडिया जुलै महिन्यात वेस्टइंडिज विरूद्ध टेस्ट, वनडे आणि टी20 सामने खेळणार आहे. या सामन्यानंतर टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेपुर्वी जसप्रीत बुमराह आणि के एल राहुल सारखे स्टार खेळाडू दुखापतीतून सावरून मैदानात वापसी करण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आशिया कपमध्ये टीम इंडियाची ताकद वाढणार आहे. यामुळे टीम इंडियाला दिलासा मिळणार आहे. (ind vs wi asia cup jasprit bumrah and kl rahul comeback chances bcci)
ADVERTISEMENT
येत्या सप्टेंबर महिन्यात आशिया कप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेची तारीख आणि वेळापत्रक अद्याप निश्चित करण्यात आले नाही आहे. मात्र ते लवकरच जाहिर होण्याची शक्यता आहे. त्यात द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि सलामीवीर केएल राहुल आशिया कपच्या टीम इंडियाच्या संघात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे टीम इंडियाला दिलासा मिळणार आहे.
हे ही वाचा : नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाक सामना, भारताचा माजी क्रिकेटर कोणावर भडकला?
बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर गेला होता. या त्याच्या दुखापतीमुळे तो आशिया कप, टी20 वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन यासारख्या अनेक बड्या स्पर्धांना मुकला होता. याचा फटका टीम इंडियाला देखील बसला होता. आता बुमराह आणि राहुल हे खेळाडू सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) बंगळुरूत उपचार घेत आहेत. बुमराहने NCAच्या नेट्समध्ये गोलंदाजीचा सराव केला होता. या सरावा दरम्यान वेदना होत असल्याची कोणतीच तक्रार नव्हती. त्यामुळे तो आता पुर्णपणे बरा होत असल्याचे चित्र आहे.
हे वाचलं का?
तर के एल राहुलच्या उजव्या मांडीला दुखापत झाल्यानंतर त्याने मध्येच आयपीएलमधून माघार घेतली होती. या दुखापतीमुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपलाही मुकला होता. आता NCAमध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आणि तोही नेट्समध्ये सराव करतोय. जसप्रीत बुमराह आणि के एल राहुल सध्या NCAच्या नेट्समध्ये सराव करतायत.या सरावामुळे ते दुखापतीतून सावरत असल्याचे चित्र आहे. आर्यलंड दौ्ऱ्यापुर्वी ते मैदानात वापसी करण्याची शक्यता आहे. मात्र बीसीसीआय रिस्क न घेता त्यांनी आशिया कपमध्ये संधी देण्याची शक्यता आहे.
दरम्यान आता जसप्रीत बुमराह आणि के एल राहुल यांनी मैदानात वापसी केल्यास टीम इंडियाला दिलासा मिळणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाक सामना ‘या’ दिवशी
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT