India in World Cup 2023 : विश्व चषक स्पर्धेत भारताला कोणता संघ जाणार जड?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Team India Match schedule in World Cup 2023 : The schedule of ODI World Cup 2023 to be hosted by India in October-November this year.
Team India Match schedule in World Cup 2023 : The schedule of ODI World Cup 2023 to be hosted by India in October-November this year.
social share
google news

Team India World Cup 2023 Match schedule : यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्व चषकाचे वेळापत्रक मंगळवारी (27 जून) जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत, भारतीय संघाला 9 वेगवेगळ्या ठिकाणी साखळी सामने खेळावे लागतील, जे खूप आव्हानात्मक असणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षांपासून आयसीसी विजेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या या टीम इंडियाला सुरुवातीच्या सामन्यांमध्येच कठीण आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

ADVERTISEMENT

भारतीय संघ विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषकातील सर्वोत्तम खेळासाठी ओळखला जातो. यानंतर संघाची दिल्लीत अफगाणिस्तानशी लढत होईल, ज्यांच्याकडे जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज आहेत. यानंतर 15 ऑक्टोबरला पाकिस्तानशी सामना होणार आहे.

भारतीय संघासमोर त्याच्या सर्वोत्तम कामगिरीचे आव्हान नेहमीच असते. पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाचा विक्रम उत्कृष्ट राहिला असला, तरी या सामन्यात संघावर अपेक्षांचे ओझे सर्वाधिक असेल. विश्वचषकात भारतीय संघ कोणत्या संघांसोबत खेळणार आहे आणि त्यांच्यासमोर कोणती आव्हाने असतील, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

हे वाचलं का?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चेन्नई)

यावेळी भारतीय संघ मायदेशातील मैदानावर एकदिवसीय विश्वचषक खेळत असला तरी त्याला बहुतांश संघांचे आव्हान असेल. भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. सर्वाधिक 5 वेळा जेता राहिलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ हा त्याच्या वेगळ्या खेळासाठी ओळखला जातो. चेन्नईच्या फिरकी खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाशी मुकाबला करणे भारतासाठी कठीण आव्हान असेल.

हेही वाचा >> ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर, भारत-पाक सामना ‘या’ दिवशी

तसे पाहता, विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 12 सामने झाले आहेत. यात कांगारूंच्या संघाचा वरचष्मा राहिलेला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने 8 सामने जिंकले आहेत, तर टीम इंडियाने 4 वेळा विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत यावेळीही टीम इंडियाला खूप सावध राहण्याची गरज आहे. दुसरीकडे चेन्नईच्या उष्ण आणि दमट हवामानात संथ आणि फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर 8 ऑक्टोबर रोजी फिरकी आक्रमणामुळे ऑस्टॅलियन संघाला रोखण्याची आशा भारतीय संघाला आहे.

ADVERTISEMENT

भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दिल्ली)

ऑस्ट्रेलियानंतर भारतीय संघाचा दिल्लीच्या मैदानावर अफगाणिस्तान संघाशी मुकाबला होणार आहे. हा संघ देखील कमकुवत समजणं धोक्याचं आहे. अफगाणिस्तानकडे राशिद खान आणि मोहम्मद नबी सारखे अनेक जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज आहेत, ज्यांच्या बळावर अफगाणिस्तान केव्हाही पलटवार करू शकतो.

ADVERTISEMENT

चॅम्पियन राहिलेल्या वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेला पराभूत करून अफगाणिस्तानने स्वबळावर पात्रता फेरीत स्थान मिळवलेलं असल्याने भारतीय संघाला धोक्याची चांगलीच जाणीव आहे. तसे पाहता विश्वचषकात भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकच सामना झाला आहे. 2019 साउथॅम्प्टन वनडेमध्ये भारतीय संघाने 11 धावांनी विजय मिळवला होता.

भारत विरुद्ध पाकिस्तान (अहमदाबाद)

१५ ऑक्टोबरला भारतीय संघाचा महत्त्वाचा सामना होणार आहे. टीम इंडियाचा मुकाबला पाकिस्तानशी होईल. या महत्त्वाच्या सामन्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असेल अशी अपेक्षा आहे. जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्ध्याचा पराभव करण्याची संधी भारताला यानिमित्ताने मिळणार आहे.

आतापर्यंतच्या विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्धची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. आतापर्यंत विश्व चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 7 सामने झाले आहेत आणि ते सर्व टीम इंडियाने जिंकले आहेत. पाकिस्तानला आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला हरवता आलेले नाही.

भारत विरुद्ध बांगलादेश (पुणे)

त्यानंतर 19 ऑक्टोबरला भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. हा संघ आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये मजबूत मानला जातो. या संघाने गेल्या वर्षी एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव केला होता. पुण्यातील फलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर संघाला बांगलादेशविरुद्धही सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.

हेही वाचा >> भाजपचं चार घटकांवर लक्ष! PM मोदींनी लोकसभा निवडणुकीचा अजेंडा केला सेट

भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत बांगलादेशविरुद्ध 4 सामने खेळले असून त्यापैकी 3 सामने जिंकले आहेत. 2007 च्या विश्वचषकात एकमेव सामना हरला होता. त्यानंतर या पराभवामुळे टीम इंडियाला ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडावे लागले होते. त्यामुळे बांगलादेशला कमी लेखणेही जड जाऊ शकते.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (धर्मशाला)

टीम इंडियाला साखळी फेरीतील पाचव्या सामन्यात न्यूझीलंडकडून सर्वात कठीण आव्हान मिळू शकते. हा सामना 22 ऑक्टोबर रोजी धर्मशाला येथे होणार आहे. विश्वचषकात भारताला अनेकदा न्यूझीलंडकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागले आहे आणि धर्मशाला येथील परिस्थिती त्यांच्या खेळाला अनुकूल असेल.

समजून घ्या >> महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भुरळ घालणारं KCR यांचं विकासाचं Telangana Model काय?

न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषकात भारतीय संघ नेहमीच कमकुवत दिसला आहे. या स्पर्धेत 8 वेळा उभय संघांमध्ये सामने झाले आहेत. यापैकी भारतीय संघाने केवळ 3 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंड संघाने 5 सामने जिंकले आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड (लखनौ)

भारतीय संघाला त्यांच्या सहाव्या सामन्यापूर्वी आठवडाभराचा ब्रेक मिळणार आहे. त्यानंतर 29 ऑक्टोबरला लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्ध सामना होणार आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) या ठिकाणी धावा करणे खूप आव्हानात्मक होते. विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यात बरोबरीची स्पर्धा झाली आहे. या स्पर्धेत दोघांनी एकमेकांविरुद्ध 8 सामने खेळले, ज्यामध्ये इंग्लंडने 4 आणि भारताने 3 सामने जिंकले. एक सामना अनिर्णित राहिलेला आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (कोलकाता)

भारतीय संघ आपला सातवा सामना क्वालिफायर संघाविरुद्ध 2 नोव्हेंबर रोजी मुंबईत खेळणार आहे. हा क्वालिफायर संघ अद्याप निश्चित झालेला नाही. पण, त्यानंतर केवळ 3 दिवसांनंतर टीम इंडियाला कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. आफ्रिकन संघाविरुद्धही हा सामना सोपा असणार नाही. दक्षिण आफ्रिकेनंतर भारतीय संघ 11 नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथे पात्रता फेरीतील अन्य संघाशी भिडणार आहे.

हेही वाचा >> Pune : तरुणीवर हल्ला! दर्शना पवारचा उल्लेख करत राज ठाकरेंनी कुणाला सुनावलं?

एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जवळपास तुल्यबळ लढती झालेल्या आहेत. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 5 सामने झाले आहेत, त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने 3 सामने जिंकले असून भारतीय संघ केवळ 2 सामने जिंकू शकला आहे. अशाप्रकारे असे म्हणता येईल की आफ्रिकन संघ वरचढ आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT