IPL 2023, CSK vs GT Final: गुजरातला कशी चारली धूळ, चेन्नईच्या विजयाची 5 कारणे
आयपीएलच्या जेतेपदाचा सामना प्रचंड रोमांचक ठरला. श्वास रोखून ठेवायला लावणाऱ्या अंतिम सामन्यामध्ये चेन्नईने गुजरात टायटन्सना (GT) 5 गडी राखून (डकवर्थ लुईस पद्धतीने) धूळ चारली.
ADVERTISEMENT
IPL 2023 CSK vs GT : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने (CSK) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या जेतेपदावर नाव कोरलं. पावसाचा अडथळा आणि प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर यंदाच्या हंगामाचा विजेता राखीव दिवशी ठरला. आयपीएलच्या जेतेपदाचा सामना प्रचंड रोमांचक ठरला. श्वास रोखून ठेवायला लावणाऱ्या अंतिम सामन्यामध्ये चेन्नईने गुजरात टायटन्सना (GT) 5 गडी राखून (डकवर्थ लुईस पद्धतीने) धूळ चारली.
ADVERTISEMENT
आयपीएलचा अंतिम सामना रविवारी (28 मे) होणार होता, परंतु पावसामुळे तो एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला. म्हणजेच हा विजेतेपदाचा सामना राखीव (29 मे) दिवशी झाला. आयपीएलचं विजेतेपद कोण पटकावणार, हे समजण्यासाठी चाहत्यांना दोन दिवस वाट पाहावी लागली.
गुजरातने केले प्रयत्न पण विजयाने दिली हुलकावणी
राखीव दिवशीही पावसाने पाठ सोडली नाही. गुजरातने 20 षटकांत 214 धावा केल्या. चेन्नईची फलंदाजी सुरू होताच वरूण राजाने हजेरी लावली, त्यामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला. पावसाने व्यत्यय आणला तरी क्रिकेटप्रेमींचा उत्साह मात्र कायम होता.
हे वाचलं का?
पाऊस थांबल्यावर डकवर्थ लुईस नियमानुसार षटकं कमी करून 15 षटकांचा सामना खेळवण्यात आला. त्यामुळे चेन्नईला 171 धावांचे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना धोनी ब्रिगडने शेवटपर्यंत झूंज दिली आणि विजय खेचून आणला.
पावसाने सातत्याने व्यत्यय आणलेला हा अंतिम सामना जिंकणे धोनीसाठी तितके सोपे नव्हते, जितके चेन्नईच्या चाहत्यांना वाटत होते. रोमहर्षक सामन्यात अनेकवेळा गुजरातने सामना त्यांच्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला. गुजरात हा सामना जिंकेल असे वाटत होते, कॅप्टन कूल धोनीची रणनीती आणि निर्णायक टप्प्यावर रवींद्र जडेजाच्या सर्वोत्तम कामगिरीने सामन्याचा निकाल बदलला.
ADVERTISEMENT
Congratulations to @ChennaiIPL & @msdhoni for being crowned champions of #TATAIPL 2023. My sincere thanks to all our doting fans who braved the rains & returned in large numbers again to witness the final. Indian Cricket grows from strength to strength because of your unflinching… pic.twitter.com/bu2ZudWaMk
— Jay Shah (@JayShah) May 29, 2023
ADVERTISEMENT
चेन्नईने हा सामना जिंकला, पण मागे आहेत पाच कारणं… ती कोणती हेच जाणून घेऊयात
धोनी-जडेजा
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्सने धमाकेदार सुरुवात केली. शुभमन गिल आणि रिद्धिमान साहा यांनी सलामीला तुफानी फलंदाजी केली. यादरम्यान गिलला दोन वेळा महत्त्वपूर्ण जीवनदानही मिळाले. दीपक चहरने गिलचे दोन्ही झेल सोडले. जीवदान मिळाल्यानंतर गिल गोलंदाजांवर तुटून पडला. गिलने 19 चेंडूत 39 धावा केल्या होत्या आणि गुजरात संघाची धावसंख्या 6.5 षटकांत एकही विकेट न गमावता 67 धावा इतकी होती.
हेही वाचा >> Akash Madhwal :MIचं सेमी फायनलचं तिकीट कापणारा आकाश माधवाल कोण?
याचवेळी धोनीने फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या हाती चेंडू सोपवला. जडेजाच्या षटकातील सहाव्या चेंडूवर गिल थोडा पुढे गेला पण शॉट चुकला. यादरम्यान धोनीने चपळपणे गिलला यष्टिचित करून दोन्ही जीवदानाची भरपाई केली. गिलची ही विकेट चेन्नईसाठी खूप मोलाची होती.
गायकवाड आणि कॉनवे यांची वादळी सुरुवात
डकवर्थ लुईस नियमामुळे चेन्नईला 15 षटकांत 171 धावांचे लक्ष्य मिळाले, त्यानंतर संघाला धमाकेदार सुरूवात करून देण्याची जबाबदारी ऋतुराज गायकवाड आणि डेव्हन कॉनवे यांच्या खांद्यावर आली. त्यांनी अपेक्षेप्रमाणे वेगवान सुरुवात केली. दोघांनी 39 चेंडूत 74 धावांची सलामीची भागीदारी केली. येथूनच चेन्नईच्या विजयाचा पायाही रचला गेला. गायकवाडने 16 चेंडूत 26 तर कॉनवेने 25 चेंडूत 47 धावा केल्या.
मधल्या फळीकडून दमदार कामगिरी
चेन्नईने 78 धावांत दोन विकेट गमावल्या होत्या. गायकवाड आणि कॉनवे हे सलामीवीर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. त्यानंतर मधल्या फळीने संपूर्ण जबाबदारी घेतली. तिसऱ्या क्रमांकावर आलेला प्रभावशाली खेळाडू शिवम दुबे याने 21 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या आणि सामना जिंकूनच परतला.
हेही वाचा >> साक्षीच्या डोक्यात 7 वेळा दगड टाकणाऱ्या साहिलचं सापडलं सोशल मीडिया प्रोफाइल!
चौथ्या क्रमांकावर आलेल्या अजिंक्य रहाणेने 13 चेंडूत 27 धावा केल्या. आपला शेवटचा आयपीएल सामना खेळणारा अंबाती रायुडू पाचव्या क्रमांकावर आला. त्याने 8 चेंडूत 19 धावा केल्या. मात्र, सहाव्या क्रमांकावर उतरलेल्या कर्णधार धोनीला खातेही उघडता आले नाही आणि पहिल्या चेंडूवरच तो गोल्डन डकसह बाद झाला.
जडेजाकडून सर्वोत्तम फिनिश
धोनीनंतर स्टार फिनिशर रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर आला. शेवटच्या 2 चेंडूंवर संपूर्ण खेळ फिरवणारा तो खर्या अर्थाने सामन्याचा हिरो ठरला. वास्तविक हा सामना शेवटच्या षटकात खूपच रोमांचक झाला. अक्षरशः चाहत्यांचे श्वास रोखले गेले. चेन्नईला विजयासाठी शेवटच्या दोन चेंडूंवर 10 10 धावांची गरज होती आणि जडेजा स्ट्राइकवर होता. वेगवान गोलंदाज मोहित शर्माच्या चेंडूवर त्याने पहिला षटकार मारला. यानंतर शेवटच्या चेंडूवर चौकार मारून जडेजाने विजय खेचून आणला. या सामन्यात जडेजाने 6 चेंडूत नाबाद 15 धावा केल्या.
रशीद आणि शमीचा शोध लागला
या संपूर्ण हंगामात गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 17 सामन्यात सर्वाधिक 28 विकेट घेतल्या आणि पर्पल कॅपचा विजेता ठरला. त्याच्याशिवाय अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान आणि वेगवान गोलंदाज मोहित शर्मानेही 27-27 विकेट्स घेतल्या. हे तिन्ही गोलंदाज गुजरात संघाचे मोठे बलस्थान होते, पण धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघही त्यांच्याविरुद्ध पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेला दिसला.
हेही वाचा >> Mohsin Khan : वडील आयसीयूमध्ये अन् त्याने गाजवलं मैदान; मोहसीन का झाला भावूक?
या सामन्यात चेन्नईचे फलंदाज शमी आणि रशीद जाळ्यात अडकलेच नाही. मोहितला 3 विकेट घेण्यात यश आले असले तरी विजय हिरावून घेता आला नाही. शमीने 3 षटकांत 29 आणि रशीदने 3 षटकांत 44 धावा दिल्या. या सामन्यात नूर अहमदने 17 धावांत 2 बळी घेतले.
अशा प्रकारे चेन्नईने सामना आणि विजेतेपद पटकावले
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने 4 गडी गमावून 214 धावा केल्या. साई सुदर्शनने संघासाठी 47 चेंडूत 96 धावांची तुफानी खेळी केली. त्याने 6 षटकार आणि 8 चौकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 204.25 होता. सुदर्शनशिवाय ऋद्धिमान साहाने 54 आणि शुभमन गिलने 39 धावा केल्या. चेन्नईकडून मथिशा पाथिरानाने २ बळी घेतले.
चेन्नई संघाने 215 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला सुरुवात केलीच होती की पहिल्याच षटकात पाऊस आला आणि सामना थांबवावा लागला. यानंतर जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा सामना 15 षटकांचा करण्यात आला. तसेच डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला 171 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात चेन्नई संघाने 5 विकेट्स गमावून सामना आणि विजेतेपद पटकावले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT