Shreyas Iyer पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त; IPL मध्ये खेळणार का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shreyas Iyer injured : भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे (Injury) दीर्घकाळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहू शकतो. अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या पाठीला दुखापत झाल्याचं समोर आलं. पाचव्या दिवशी श्रेयस अय्यरला ना फलंदाजी करता आली ना तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर बाहेर आला. (Shreyas Iyer suffering from back injury)

ADVERTISEMENT

आता असे वृत्त आहे की तो केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतूनच नाही तर आयपीएल 2023 च्या सुरुवातीच्या सामन्यांमधूनही बाहेर जाऊ शकतो. जर त्याच्यावर शस्त्रक्रिया करायची असेल तर दोन महिने परत येणे शक्य होणार नाही. अहमदाबाद कसोटीनंतर कर्णधार रोहित शर्माने अय्यरची प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले होते.

WTCFinal: ओव्हलच्या मैदानाने वाढवली भारताची चिंता, बघा आकडेवारी काय सांगतो?

हे वाचलं का?

भारताला आता १७ मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. अय्यर यात खेळू शकणार नाही. तसेच, सध्याच्या परिस्थितीत तो ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. या स्पर्धेत तो कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व करतो. जानेवारीत अय्यर पहिल्यांदा पाठदुखीशी झुंजताना दिसला होता. त्यानंतर त्याला न्यूझीलंडविरुद्धची वनडे आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची पहिली कसोटी सोडावी लागली.

अय्यरच्या पाठीची दुखापत गंभीर

स्पोर्ट्स तकला मिळालेल्या माहितीनुसार, अय्यरच्या पाठीची दुखापत गंभीर आहे. जर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली तर तो किमान दोन महिने खेळापासून दूर असेल. शस्त्रक्रियेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत बीसीसीआय लवकरच निर्णय घेणार आहे. अलीकडेच, भारतीय बोर्डाने अय्यरच्या प्रकरणात तज्ज्ञांचा सल्ला घेणार असल्याचे सांगितले होते.

ADVERTISEMENT

WTC 2023: टीम इंडियाला लॉटरी! वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं तिकीट कन्फर्म

ADVERTISEMENT

अय्यरच्या दुखापतीबद्दल कर्णधार रोहित शर्मा म्हणाला…

भारतीय कर्णधार रोहित शर्माने 13 मार्च रोजी सांगितले की, श्रेयस पाठीचं वाढल्याने चांगल्या स्थितीत दिसत नाही. तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कधी परतणार हे त्याने सांगितले नाही. रोहितला अय्यरच्या फिटनेसबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘त्याच्यासोबत जे घडले ते दुर्दैवी आहे. त्याला फलंदाजीसाठी दिवसभर थांबावे लागले आणि नंतर दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्याच्या पाठीचा त्रास पुन्हा निर्माण झाला. त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

तो पुढे म्हणाला, ‘मला स्कॅनचा नेमका अहवाल माहीत नाही, पण त्याची प्रकृती ठीक नसल्याचे दिसते. म्हणूनच तो इथे नाही. त्याला बरे होण्यासाठी किती वेळ लागेल किंवा तो परत कधी येईल हे आम्हाला माहीत नाही. जेव्हा त्याची दुखापत उघड झाली तेव्हा तो चांगल्या स्थितीत दिसत नव्हता. मला आशा आहे की तो लवकरच बरा होईल आणि पुन्हा खेळायला सुरुवात करेल, असं रोहित शर्मा म्हणाला

टीम इंडियाला मोठा धक्का, खांद्याच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर वन-डे सिरीजमधून बाहेर

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT