Video : 'बांग्लादेशी टायगर'ला चोप चोप चोपलं, सिराजचा 'या' प्रकरणाशी संबंध काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ind vs ban bangladesh tiger printed fan beaten by cricket fan allged of abusing mohmmad siraj
टायगर रोबीने सिराजसोबत वाईट वर्तन केले
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बांग्लादेशी फॅनला बेदम मारहाण

point

क्रिकेटच्या मैदानातच झाली मारहाण

point

बांग्लादेशी फॅनचा व्हिडिओ आला समोर

India vs Bangladesh Kanpur Test : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ हा पावसामुळे फारसा होऊ शकला नाही आहे. त्यामुळे आज 35 ओव्हरचाच खेळ झाला. ज्यामध्ये बांग्लादेशने 3 विकेट गमावून 107 धावा केल्या आहेत. पण सामन्याच्या पहिल्याच दिवशी खेळाडूंपेक्षा बांग्लादेशी फॅनशी खूप चर्चा रंगली. टायगर रोबी असे या बांग्लादेशी फॅनचे नाव आहे. या फॅनला सामन्या दरम्यान बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भातला व्हिडिओही समोर आला आहे. असे असताना या प्रकरणात आता मोहम्मद सिराजचं नाव समोर येतंय. त्यामुळे सिराजचा या प्रकरणाशी संबंध काय? हे जाणून घेऊयात. (ind vs ban bangladesh tiger printed fan beaten by cricket fan allged of abusing mohmmad siraj) 

बांग्लादेशचा डायहार्ट फॅन टायगर रोबी हा कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडीअमवर संघाला सपोर्ट करण्यासाठी पोहोचला होता. टायगर रोबीला बाऊंड्री लाईनजवळच जागा मिळाली होती. त्यामुळे तो संघाला जोरजोरात ओरडून चिअर करत होता. या दरम्यानच टीम इंडियाचा गोलंदाज  मोहम्मद सिराज बाऊंड्री लाईनवर फिल्डींग करण्यासाठी पोहोचला होता. मिळालेल्या माहितीनुसार टायगर रोबीने सिराजसोबत वाईट वर्तन केले. तसेच त्याने शिविगाळ केल्याचे बोलले जात आहे. टायगर रोबीच्या या वर्तनामुळे भारतीय चाहत्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी टायगर रोबीला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा : ठाकरेंचा दणका! भाजप खासदाराच्या 'लाडक्या बहिणी'चा निवडणुकीत पराभव

या मारहाणीनंतर त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये त्याची अवस्था खूपच बिकट झाली आहे. त्याच्या पाठीवर जबरदस्त गुच्चे मारले आहेत. तसेच नेमक्या कोणत्या भागात ही घटना घडली हे देखील तो सांगताना दिसला आहे. यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखलं केलं आहे. सध्या त्याच्यावर उपचार सूरू आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान कानपूरमध्ये बांगलादेशी संघाचा विरोध होत आहे. बांगलादेशचा संघ कानपूरला आला तेव्हा काही संघटनांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर हिंदूंवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संघटनांमध्ये रोष आहे. बांगलादेशी फॅनला झालेली मारहाण त्याच्या निगडीत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. पण याबाबत ठोस असं काहीच नाही.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांचे अर्ज मंजूर, पण बँकेत किती पैसे येणार?

दुसऱ्या टेस्ट सामन्यात नाणेफेक टीम इंडियाच्या बाजूने लागली होती. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बांगलादेशने पहिल्या दिवशी 3 गडी बाद 107 धावा केल्या आहे. पहिल्या दिवशी फक्त 35 षटकांचा सामना झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT