IPL Final 2023: IPL फायनलमध्ये दोन भाऊ आमनेसामने? असा घडू शकतो इतिहास

मुंबई तक

ADVERTISEMENT

ipl 2023 final match scenario : GT, CSK, LSG and MI
ipl 2023 final match scenario : GT, CSK, LSG and MI
social share
google news

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मधील प्लेऑफचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. 21 मे (रविवार) रोजी चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली, तर पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये धडक दिली. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांनी आधीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. चौथ्या संघाचंही स्थान निश्चित झालं.

ADVERTISEMENT

पहिला क्वालिफायर सामना 23 मे रोजी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 24 मे रोजी एलिमिनेटर सामना होणार आहे. हे दोन्ही सामने चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहेत. तसं बघितलं तर यावेळी आयपीएलचा अंतिम सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातही होऊ शकतो. मात्र, यासाठी दोन्ही संघांना काही समीकरणे आपल्या बाजूने करावी लागणार आहेत.

हेही वाचा >> ‘वर्ल्ड क्रिकेटमध्ये फलंदाज…’, सचिनने केले सुर्यकुमार यादवच्या ‘त्या’ सिक्सचे कौतूक

अंतिम सामन्यात पंड्या बंधूंमध्ये होऊ शकते लढत

गुजरात टायटन्सच्या संघाने पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला, तर तो अंतिम फेरीत पोहोचेल. अशा परिस्थितीत लखनौ सुपर जायंट्सला एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवावे लागेल. त्यानंतर दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात (26 मे) लखनऊला चेन्नईविरुद्ध विजय मिळवावा लागेल. जर गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात अंतिम सामना (28 मे) झाला तर ते खूप खास असेल. आयपीएलच्या 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे बघायला मिळू शकते दोन सख्खे भाऊ अंतिम सामन्यात आमनेसामने येतील आणि कर्णधारही असतील.

हे वाचलं का?

हार्दिक-कृणालची राहिली आहे चमकदार कामगिरी

IPL 2023 मधील हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांच्या कामगिरीवर नजर टाकली तर दोघांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने फलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली आहे, तर कृणाल पंड्याने गोलंदाजीत सर्वांना प्रभावित केले आहे. हार्दिकने आतापर्यंत 13 सामन्यात 28.90 च्या सरासरीने 289 धावा केल्या आहेत आणि 3 बळीही घेतले आहेत. दुसरीकडे, डावखुरा अष्टपैलू कृणाल पंड्याने 14 सामन्यात 9 विकेट घेण्याव्यतिरिक्त 20 च्या सरासरीने 180 धावा केल्या आहेत.

ADVERTISEMENT

गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचा हा फक्त दुसरा आयपीएल हंगाम आहे. IPL 2022 च्या लिलावापूर्वी हार्दिकला गुजरात फ्रँचायझीने 15 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. दुसरीकडे, मोठा भाऊ कृणाल पंड्याला लखनऊच्या संघाने आयपीएल लिलावादरम्यान 8.25 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> काँग्रेसचे आशिष देशमुख भाजपच्या वाटेवर? कोणत्या नेत्याचा होणार गेम?

केएल राहुल जखमी अन् कृणालकडे आले कर्णधारपद

गुजरात टायटन्सने पहिल्याच सत्रात हार्दिक पंड्याला आपल्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले होते. हार्दिकने अपेक्षा पूर्ण करत गुजरातला चॅम्पियन बनवले. दुसरीकडे, कृणालला लखनौ संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले, तर संघाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली होती. मात्र, कर्णधार केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्यानंतर कृणालकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. कृणाल आणि हार्दिक अनेक वर्षे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून एकत्र खेळले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT