Asia cup 2023 : बुमराह टीम इंडियासाठी कधी परतणार मैदानात! मोठी अपडेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

asia cup 2023 : jasprit bumrah health news; he will come back soon in team india
asia cup 2023 : jasprit bumrah health news; he will come back soon in team india
social share
google news

Jasprit Bumrah injury latest update : आशिया चषक 2023 (Asia Cup, Jasprit Bumrah) आधी टीम इंडियाला दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. बर्‍याच दिवसांपासून दुखापतग्रस्त असलेल्या जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे म्हटलं जात आहे की, तो 18 ऑगस्टपासून आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून टीम इंडियात पुनरागमन करू शकतो. त्यानंतर पूर्ण फॉर्ममध्ये आल्यानंतर तो आशिया कप 2023 मध्ये भारतीय संघात परतण्यासाठी फीट होईल. (Will Jasprit Bumrah play Asia Cup 2023?)

ADVERTISEMENT

न्यूज18 च्या रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराह सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे आणि आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून पुनरागमन करू शकतो. व्हीव्हीएस लक्ष्मण, वैद्यकीय विभागाचे प्रमुख नितीन पटेल यांच्या देखरेखीखाली बुमराह एनसीएमध्ये प्रशिक्षण घेत आहे. त्यांच्यासोबत फिजिओथेरपिस्ट एस रजनीकांतही आहेत.

हेही वाचा >> ODI World Cup 2023 : ‘या’ दिवशी भिडणार भारत पाकिस्तान, वेळापत्रक आलं समोर

न्यूझीलंड दौऱ्यात झाला होता जायबंदी

मागच्या वर्षी न्यूझीलंड दौऱ्यावर बुमराहच्या पाठीला दुखापत झाली होती. यानंतर बुमराहने सप्टेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन केले होते. मात्र पूर्णपणे बरा न झाल्यामुळे त्याला पुन्हा क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागले. यानंतर बुमराह दुखापतीवर उपचार घेण्यासाठी न्यूझीलंडला गेला होता. जिथून परतल्यानंतर तो अजूनही एनसीएमध्ये आहे. या काळात तो आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्येही भारताकडून खेळू शकला नाही.

हे वाचलं का?

हेही वाचा >> Ishan Kishan : ईशान दुलीप ट्रॉफीमध्ये का खेळत नाही? प्लॅन आला समोर

बुमराहच्या पुनरागमनामुळे मिळेल दिलासा

आता आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत बुमराहचे पुनरागमन झाले, तर टीम इंडियासाठी मोठा दिलासा असेल. कारण यानंतर भारताला आशिया कप 2023 वनडे फॉरमॅटमध्ये खेळायचा आहे. तर ऑक्‍टोबर महिन्यात टीम इंडियाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 देखील घरच्या मैदानांवर खेळायचा आहे. या मोठ्या स्पर्धांचा विचार करता बुमराह भारतीय संघात असणं खूप महत्त्वाचे ठरते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT