IPL 2023: पॉवरप्लेमध्ये विराटसह ‘हे’ तगडे फलंदाज करतायेत ‘टूकटूक’
IPL 2023: आयपीएलमध्ये अनेक दिग्गज फलंदाजांना आपला नेमका फॉर्म गवसलेला नाही. त्यामुळे अगदी पॉवरप्ले मध्ये देखील हे फलंदाज धीम्या गतीने फलंदाजी करत आहेत. पाहा यामध्ये नेमका कोणा-कोणाचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
IPL 2023 kl rahul virat kohli rohit sharma are also in the list of batsmen who have played most dot balls in powerplay
मुंबई: आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये अनेक फलंदाजांनी आपल्या तुफानी बॅटिंगने विरोधी संघाला सळो की पळो करुन सोडलं आहे. पण असं असताना काही असेही फलंदाजही आहेत, की जे पॉवरप्लेमध्ये (1-6 ओव्हर) खूपच धीम्या गतीने फलंदाजी करत असल्याचं पाहायला मिळालं आहे. अशा फलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये (Powerplay) बरेच डॉट बॉल (Dot Balls) खेळले आहेत. या यादीत केएल राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. (kl rahul virat kohli rohit sharma are also in the list of batsmen who have played most dot balls in powerplay)
आयपीएलच्या आतापर्यंतच्या टॉप 10 फलंदाजांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी पॉवरप्लेमध्ये भरपूर डॉट बॉल खेळले आहेत. या यादीत फ्लॉप टीम दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर अव्वल स्थानावर आहे. डेव्हिडने 7 सामन्यांच्या पॉवरप्लेमध्ये 68 डॉट बॉल खेळले आहेत, या सामन्यांमध्ये वॉर्नरने फक्त 168 धावा केल्या आहेत.
लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) काईल मेयर्स हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. काइलने पॉवरप्लेमध्ये 53 डॉट बॉल खेळले आहेत. काइलने एकूण सात सामन्यांत 150 धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) डेव्हिड कॉनवे डॉट बॉल खेळण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 47 डॉट बॉल खेळले आहेत. त्याचबरोबर त्याने 7 सामन्यात 139 धावा केल्या आहेत. मुंबई इंडियन्सचा (MI) इशान किशन चौथ्या स्थानावर आहे. पॉवरप्लेमध्ये त्याने 47 डॉट बॉल खेळले आहेत. इशानने 7 सामन्यात फक्त 148 धावा केल्या आहेत.
IPL 2023 पावरप्लेमध्ये डॉट बॉल खेळणारे टॉप 10 फलंदाज
फलंदाज | डॉट बॉल |
डेव्हिड वॉर्नर | 68 |
काइल मेयर्स | 53 |
रोहित शर्मा | 50 |
डेवोन कॉन्वे | 47 |
ईशान किशन | 47 |
फाफ डु प्लेसिस | 46 |
केएल राहुल | 45 |
ऋद्धिमान साहा | 45 |
यशस्वी जैसवाल | 44 |
विराट कोहली | 43 |
हैरी ब्रुक | 41 |
रहमानुल्लाह गुरबाज | 39 |
ADVERTISEMENT
पॉवरप्लेमध्ये चेंडू वाया घालविण्याच्या बाबतीत फाफ डू प्लेसिस हा पाचव्या क्रमांकावर आहे. फॅफने एकूण 8 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने पॉवरप्लेमध्ये 46 डॉट बॉल खेळले आहेत. फॅफने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 201 धावा केल्या आहेत.
हे ही वाचा>> IPL : खेळाडू खरेदी करण्यासाठी संघाकडे पैसे कसे येतात, कमाई कशी होते?
सहाव्या क्रमांकावर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आहे. राहुलने 7 आयपीएल सामने खेळले आहेत. या 7 सामन्यांच्या पॉवरप्लेमध्ये त्याने 45 डॉट बॉल खेळले आहेत. त्याचबरोबर केएल राहुलने या सामन्यांमध्ये 128 धावा केल्या आहेत.
साहा, यशस्वी जैस्वाल, कोहली यांचाही समावेश आहे
पॉवरप्लेमध्ये डॉट बॉल खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये ऋद्धिमान साहा, यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांचाही समावेश आहे. साहा आणि जैस्वाल यांनी 7 सामन्यात अनुक्रमे 45 आणि 44 डॉट बॉल खेळले आहेत. त्याचबरोबर विराट कोहलीने 8 सामन्यात 43 डॉट बॉल खेळले आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT