IPL 2023 DC vs GT: दिल्लीच्या हातातला मॅच निसटला; गुजरातने अशी पलटली बाजी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

IPL 2023 DC vs GT: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 हंगामातील 7 वा सामना अतिशय रोमांचक होता, जो दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 विकेट्स राखून विजय मिळवला. (The match slipped out of Delhi’s hands; Gujarat turned the tables)

ADVERTISEMENT

IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते?

या सामन्याने अनेकवेळा पारडं बदललं. कधी दिल्लीत, तर कधी गुजरातच्या बाजूने जाताना दिसले. पण हा सामना एकेकाळी अशा टप्प्यावर होता, जिथून दिल्लीचा संघ हा सामना आपल्या ताब्यात घेईल असे वाटत होते. पण त्यानंतरच 3 फॅक्टर समोर आले, ज्यांनी संपूर्ण खेळच बदलून टाकला.

हे वाचलं का?

दिल्लीला अडकवण्यासाठी साई सुदर्शनची रणनिती

साई सुदर्शन हा पहिला गेम चेंजर होता. 163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने एका टप्प्यावर 54 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर 21 वर्षीय साई सुदर्शन क्रीजवर होता. त्याने दिल्लीला अडकवण्यासाठी जाळे विणले आणि हळूहळू डाव पुढे सरकवण्याची आणि भागीदारी करण्याचा डाव आखला.

सुदर्शनला त्याच्या योजनेत यश आले. त्याने प्रथम विजय शंकरसोबत चौथ्या विकेटसाठी 53 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर गुजरात टायटन्सनेही 107 धावांवर विजय शंकरच्या रूपाने चौथी विकेट गमावली. येथून गुजरात संघाला विजयासाठी 40 चेंडूत 56 धावांची गरज होती. त्यानंतर सुदर्शनने डेव्हिड मिलरसह क्रीझवर डावाचे नेतृत्व केले.येथून सुदर्शनने मिलरसोबत 5व्या विकेटसाठी 29 चेंडूत 56 धावांची नाबाद भागीदारी केली. अशाप्रकारे सुदर्शनने दिल्लीला आपल्या जाळ्यात अडकवून सामना बाहेर काढला.

ADVERTISEMENT

इम्पॅक्ट खेळाडू विजय शंकरची युक्ती यशस्वी ठरली

कर्णधार हार्दिक पंड्याने विजय शंकरचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला नाही. फलंदाजीदरम्यान जोशुआ लिटलला क्षेत्ररक्षण देऊन त्याने विजय शंकरला प्रभावशाली खेळाडू म्हणून मैदानात उतरवले. पांड्याची ही युक्ती यशस्वी ठरली. विजय शंकर क्रीजवर आला तेव्हा गुजरातने 54 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर विजय शंकरने 23 चेंडूत 29 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढले. विजयने आपल्या स्थिर खेळीत 3 चौकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेटही 126.09 होता. विजयने साई सुदर्शनसोबत 53 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही केली.

ADVERTISEMENT

IPL 2023 : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळ शून्यावर बाद होणारे खेळाडू कोण?

दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सने पराभव केला

या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 8 गडी गमावून 162 धावा केल्या होत्या. दिल्ली संघाकडून उपकर्णधार अक्षर पटेल आणि कर्णधार डेव्हिड वॉर्नरने शानदार खेळी केली. अक्षरने 22 चेंडूत 36 धावा केल्या. तर वॉर्नरने 32 चेंडूत 37 धावा केल्या. तर गुजरात टायटन्सकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकीपटू राशिद खानने 3-3 बळी घेतले. अल्झारी जोसेफला 2 बळी मिळाले.

163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने 18.1 षटकांत 6 गडी राखून सामना जिंकला. संघासाठी 21 वर्षीय साई सुदर्शनने 48 चेंडूत 62 धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान त्याने 2 षटकार आणि 4 चौकार मारले. सुदर्शनचा स्ट्राईक रेट 129.17 होता. त्याच्याशिवाय डेव्हिड मिलरने 193.75 च्या स्ट्राईक रेटने 16 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. तर विजय शंकरने 29 धावा केल्या. दिल्ली संघाकडून एनरिक नॉर्खियाने 2 बळी घेतले.

IPL 2023 : चरणस्पर्श! धोनी समोर येताच अरिजीत सिंग पडला पाया, चाहत्यांची जिंकली मनं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT