IND vs AUS Final: 20 वर्षांपूर्वी एका चुकीमुळे हुकलं विजेतेपद, भारताचा का झाला होता पराभव?
India vs Australia World Cup 2023 Final : 2003 नंतर प्रथमच भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषकाच्या फायनलमध्ये भिडणार आहेत. गेल्या वेळी जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा भारताला एक चूक महागात पडली.
ADVERTISEMENT
World Cup 2023 Final, India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघ 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला दोन्ही संघ विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी भिडणार आहेत. यापूर्वी 2003 मध्ये दोन्ही संघ जेव्हा अंतिम सामन्यात आमनेसामने आले होते, त्यावेळी एका चुकीने भारताची विश्वविजेता बनण्याची संधी हिरावून घेतली होती. (Why did India lost 2003 World Cup against australia?)
ADVERTISEMENT
23 मार्च 2003 रोजी जोहान्सबर्ग येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकातील अंतिम सामना खेळला गेला होता, ज्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 2 गडी गमावून 359 धावा केल्या होत्या.
संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी, पण…
360 धावांच्या पाठलाग करताना टीम इंडियाने 39.2 षटकात 234 धावाच केल्या होत्या. भारतीय संघ 125 धावांनी फायनलमध्ये पराभूत झाला होता. त्या सामन्यात रिकी पाँटिंग हा सामनावीर ठरला होता. त्याने 121 चेंडूत नाबाद 140 धावा केल्या होत्या. भारताकडून वीरेंद्र सेहवागने सर्वाधिक 82 धावा केल्या होत्या.
हे वाचलं का?
प्रेरणादायी स्टोरी >> तीन वेळा आत्महत्येचा विचार… संघर्षातून असा घडला मोहम्मद शमी!
भारताने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती, परंतु अंतिम फेरीत एक चूक भारतीय संघाला महागात पडली होती. ती चूक टीम इंडियाने नाणेफेकच्या वेळी केली होती.
भारतीय संघाने काय केली होती चूक?
सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंग नाणेफेकीसाठी मैदानात आले, तेव्हा दोघेही नाणेफेक जिंकण्याचा विचार करत होते. नाणेफेक आपण जिंकून प्रथम फलंदाजी करावी, अशी पॉन्टिंगची इच्छा होती. पण, नाणेफेक भारताने जिंकली आणि जेव्हा प्रथम फलंदाजी किंवा गोलंदाजी यापैकी एक निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा टीम इंडियाने चूक केली. गांगुलीने ऑस्ट्रेलियाचे काम सोपे केले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ‘तेव्हा तुझी सगळे मस्करी….’, ‘विराट’ कामगिरीनंतर सचिन तेंडुलकर भारावला, ड्रेसिंग रूममधला सांगितला किस्सा
चुकीचा निर्णय भारताला पडला महागात
गांगुलीने फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या या निर्णयावर पाँटिंगने असेही म्हटले होते की, मला तरीही प्रथम फलंदाजी करायची आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय भारताला महागात पडला. 2003 पूर्वी 1992 आणि 1996 मध्ये केवळ दोन संघांनी लक्ष्य गाठून विश्वचषक फायनल जिंकली होती. ऑस्ट्रेलियाने भारताच्या चुकीच्या निर्णयाचा पुरेपूर फायदा उठवला आणि भरपूर धावा केल्या. या सामन्यात भारताने 37 धावा अतिरिक्त दिल्या होत्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT