विराट कोहली-गौतम गंभीरला लाखोंचा दंड? पण, भरणार दुसरेच,’हा’ नियम बघा

मुंबई तक

ADVERTISEMENT

virat kohli vs gautam gambhir fine who will pay the fine
virat kohli vs gautam gambhir fine who will pay the fine
social share
google news

Virat kohli Gautam Gambhir Fine : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 1 मे रोजी आरसीबी (RCB) आणि लखनऊमध्ये (LSG) रंगलेल्या सामन्या दरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आणि लखनऊचा कोचिंग स्टाफ गौतम गंभीरमध्ये (Gautam Gambhir) भांडण झाल्याची घटना घडली होती. या भांडणाचे व्हिड़िओ देखील व्हायरल झाले होते. या भांडणानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीरला दंड ठोठावला होता. आता या दंडाची रक्कम कोण भरणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासोबत आयपीएलच्या नियमानूसार हा दंड कोण भरतो? हे जाणून घेऊयात. (virat kohli vs gautam gambhir fine who will pay the fine what was the rule)

ADVERTISEMENT

असा सुरु झाला राडा…

लखनऊचा 18 धावांनी पराभव केल्यानंतर आरसीबीने जल्लोष केला होता. या जल्लोषानंतर अनेक प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांशी संवाद साधत आहे.सामना संपल्यानंतर मेयर्स आणि विराट कोहली एकत्र चालत होते. या दरम्यान मेयर्सने कोहलीला विचारले की, तो सामन्या दरम्यान सतत अपशब्द का वापरत होता. यावर तो माझ्याकडे पाहत होता? असे उत्तर विराटने दिले. याआधी अमित मिश्राने अंपायर्सकडे विराट कोहली (Virat Kohli) नवीन उल हकला शिवीगाळ करत असल्याची तक्रार दिली होती. या दरम्यान मेयर्स आणि विराटमध्ये चर्चा सुरु असताना,गौतम गंभीरने (Gautam Gambhir) मेयर्सला ओढत त्याला विराटशी न बोलण्याचा सल्ला दिला. या दरम्यानच विराटने काही तरी टिपण्णी केली आणि वादाला तोंड फुटले होते. यानंतर गौतम आणि विराटमध्ये शाब्दीक युद्ध ऱंगले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.

हे ही वाचा : VIDEO : आयपीएलच्या मैदानात तुफान राडा,फॅन्स आपापसातच भिडले

विराट- गंभीरला इतका दंड

क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीची (Virat Kohli) आयपीएलची सॅलरी 15 कोटी रूपये आहे.याचा अर्थ प्रत्येक सामन्यासाठी तो 1.07 करोड रूपये घेतो. यानुसारच 14 सामन्यांची मॅच फी ठरते. त्यामुळे गंभीरशी वाद घातल्याने कोहलीला आता 1.07 करोडचे नुकसान होणार आहे. पण जर आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचली तर विराटची फी रिवाईस होईल. त्यामुले त्याला 1 करोड रूपयांचा फटका बसणार आहे. गौतम गंभीरची एका सामन्याची मॅच फी 25 लाख रूपये आहे. त्यामुळे त्याला लाखांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

हा दंड कोण भरतो?

मॅच दरम्यान झालेली भांडणे किंवा स्लो ओव्हररेट या सर्व प्रकरणात ज्यावेळेस दंड बसतो तेव्हा तो खेळाडू नव्हे तर त्यांच्या फ्रेंचाईजी टीमना भरावा लागतो. नियमानुसार बीसीसीआय स्पर्धेनंतर फ्रेंचाईजी टीमला एक बील पाठवते. हे बील प्रत्येक टीमला भरावेच लागते. त्यामुळे असे पाहायला गेले तर कोहली आणि गंभीरचा दंड आता त्यांच्या त्यांच्या फ्रेंचाईजी टीम्सनाच भरावा लागणार आहे. आता यामध्ये फ्रेंचाईजी टीम खेळाडूच्या पगारातून दंडाची रक्कम कापते की नाही, याची माहिती खेळाडूंच्या करारात असते.

हे ही वाचा : WTC सामन्यापुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT