Ishan Kishan : ईशान दुलीप ट्रॉफीमध्ये का खेळत नाही? प्लॅन आला समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ishan Kishan, who is part of the Test Team India of the World Test Championship Final, now he is out of Duleep Trophy.
Ishan Kishan, who is part of the Test Team India of the World Test Championship Final, now he is out of Duleep Trophy.
social share
google news

Ishan Kishan, Duleep Trophy : भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या (WTC Final) टीम इंडियाचा भाग असलेला ईशान किशन सध्या चर्चेत आहे. WTC फायनलसाठी ईशानला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळाली नाही आणि त्याला प्रेक्षक म्हणून सामना बघावा लागला. यानंतर आता तो दुलीप ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. यामागचे कारण म्हणजे 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याला विशेष तयारी करायची आहे. ‘न्यूज18’च्या रिपोर्टनुसार, ईशान बंगळुरु येथील नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये सराव करणार आहे आणि त्यामुळेच तो दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार नाही.

ADVERTISEMENT

2023 मध्ये ईशान किशन टीम इंडियाने खेळलेल्या सर्व मालिकांमध्ये होता. आयपीएल 2023 मध्येही त्याने मुंबई इंडियन्ससाठी जवळपास सर्व सामने खेळले आहेत. रिपोर्टनुसार, ईशान किशनच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, ईशानसमोर आंतरराष्ट्रीय करिअर खूप मोठे आहे. त्याला मधल्या काळातही ब्रेकही मिळालेला नाही. आता क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी एनसीएमध्ये प्रशिक्षण घ्यायचे आहे.

हेही वाचा >> WTC Most Runs : नाव मोठं लक्षण खोटं! भारतीय फलंदाजांनी लाज घालवली

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ईशानची राखीव यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. आता तो वेस्ट इंडिज दौऱ्यावरही कसोटी संघात राहण्याची शक्यता आहे. यामुळेच दुलीप ट्रॉफीमध्ये भाग घेण्यासाठी त्याला फारसा वेळ मिळाला नाही. हेच खरे कारण आहे आणि इशान कोणत्याही स्पर्धेकडे दुर्लक्ष करत नाही, असं सुत्रांनी सांगितलं.

हे वाचलं का?

हेही वाचा >> MS Dhoni : ‘पीआर आणि मार्केटिंग टीमने…’; गौतम गंभीर धोनीबद्दल हे काय बोलून गेला

वेस्ट इंडिज दौरा कधी सुरू होणार?

दुसरीकडे, भारताच्या वेस्ट इंडिज दौर्‍याबद्दल बोलायचे झाले, तर ते 12 जुलैपासून सुरू होणार आहे. तर शेवटचा सामना 13 ऑगस्टला होणार आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला कसोटी सामना 12 ते 16 जुलै दरम्यान डोमिनिका येथील विंडसर पार्क येथे खेळवला जाईल. यानंतर दुसरा कसोटी सामना 20 ते 24 जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात केएस भरतला काही विशेष करता आले नाही. त्यानंतर आता ईशान किशनला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळू शकते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT