Commonwealth Games 2022: भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत ‘अच्छे दिन’, 2018 चा मोठा रेकॉर्ड तुटणार?
कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) मध्ये भारतीय संघाने आतापर्यंत वेटलिफ्टिंगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत झालेल्या खेळांमध्ये तीन सुवर्णा पदकांसह एकूण 6 पदकं जिंकली आहेत. हे सर्व पदक वेटलिफ्टिंगमध्ये आले आहेत. ‘गोल्डन गर्ल’ मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा आणि अचिंता शिउली यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचवेळी संकेत महादेव सरगर आणि बिंदियारानी देवी यांनी रौप्यपदक […]
ADVERTISEMENT
कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) मध्ये भारतीय संघाने आतापर्यंत वेटलिफ्टिंगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत झालेल्या खेळांमध्ये तीन सुवर्णा पदकांसह एकूण 6 पदकं जिंकली आहेत. हे सर्व पदक वेटलिफ्टिंगमध्ये आले आहेत. ‘गोल्डन गर्ल’ मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा आणि अचिंता शिउली यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचवेळी संकेत महादेव सरगर आणि बिंदियारानी देवी यांनी रौप्यपदक पटकावले आहे. याशिवाय 61 किलो वजनी गटात गुरूराज पुजारी याने कांस्यपदक जिंकण्यात यश मिळवले आहे.
ADVERTISEMENT
2018 मध्ये भारताने 9 पदके जिंकली होती
वेटलिफ्टिंगमध्ये भारताने चमकदार कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2018 गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये, भारताने वेटलिफ्टिंगमध्ये 9 पदके जिंकली होती, ज्यामध्ये 5 सुवर्ण पदकांचा समावेश होता. त्यादरम्यान मीराबाई चानू, संजिता चानू, पूनम यादव, सतीश शिवलिंगम, वेंकट राहुल या खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकले होते. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात प्रथमच भारताने वेटलिफ्टिंगमध्ये 5 सुवर्णपदके जिंकली होती.
2018 चा रेकॉर्ड तुटणार?
सध्याच्या स्थितीत भारत 2018 च्या कामगिरीपासून अजूनही दूर आहे. वेटलिफ्टिंगमध्ये, भारतीय खेळाडूंना अजूनही पाच वजनी गटांमध्ये भाग घ्यायचा आहे, अशा परिस्थितीत या स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या आणखी वाढू शकते. आता 2018 शी तुलना केली तर वेटलिफ्टिंगमध्ये भारताची कामगिरी सुधारते का हे येणारा काळच सांगेल.
हे वाचलं का?
वेटलिफ्टिंग नेमबाजीला मागे टाकणार का?
कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासात वेटलिफ्टिंग हा भारतासाठी सर्वात यशस्वी खेळांपैकी एक आहे. भारताने आतापर्यंत या खेळात 46 सुवर्ण, 50 रौप्य आणि 35 कांस्य पदकांसह 131 पदकं जिंकली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला यापेक्षा अधिक पदकं केवळ नेमबाजीत मिळाली आहेत. नेमबाजीत भारताने 63 सुवर्ण पदकांसह 135 पदके जिंकली आहेत. म्हणजेच भारतीय वेटलिफ्टर्सनी आणखी 5 पदके आणली तर पदकांच्या बाबतीत वेटलिफ्टिंग नेमबाजीला मागे टाकेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT