Kingfisher Beer: कशी झाली बिअरची सुरुवात, विजय माल्ल्याने तर कहरच केला...
भारतातील बियरची 60 टक्के मागणी ही किंगफिशरकडून पूर्ण केली जाते. किंगफिशर बिअरची सुरुवात कशी झाली आणि ती अनेक लोकांच्या आवडीची कशी झाली याची गोष्ट खूप रंजक झाली आहे.
ही गोष्ट 1887 मधील ज्या काळात भारतात ब्रिटीश राजवट सुरू झाली होती. त्यावेळी ब्रिटिश व्यक्ती थॉमस लेशमनने दक्षिण भारतातील निलगिरी ब्रुअरी आणि कॅसल ब्रुअरी खरेदी केली होती.
निलगिरी ब्रुअरी आणि कॅसल ब्रुअरी या दोन्हीं भट्ट्यांपासून त्यांनी "युनायटेड ब्रुअरी" तयार केली. या कंपनीने एवढा नफा कमावला की, दक्षिण भारतातील दारू बनविणाऱ्या सर्व डिस्टलरी यामध्ये सामील झाल्या.
दक्षिण भारतात हा व्यवसाय वाढीस लागल्यानंतर मात्र भारतातही त्याची व्याप्ती सातत्याने वाढत गेली.
त्याचवेळी विठ्ठल माल्ल्याच्या मनात त्यावेळी ही कल्पना आली की, या व्यवसायात एखादा भारतीय का असू नये. त्यामुळे तोही या कंपनीत तो सामील झाला.
विठ्ठल माल्ल्या हे विजय माल्ल्या यांचे वडील होते, ज्यांनी या कंपनीला चालना दिली. तरीही ती कंपनी इंग्रजांच्याच ताब्यात होती.
त्यानंतर काही वर्षांनी भारताची वाटचाल स्वातंत्र्याच्या दिशेने सुरू झाली आणि विठ्ठल माल्ल्या यांनी हळूहळू कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्वातंत्र्याच्या काळापर्यंत ते कंपनीचे पहिले भारतीय संचालक बनले.
यानंतर विठ्ठल माल्ल्याने कंपनीचा व्यवसाय चौफेर केला. 1980 मध्ये त्यांचा मुलगा विजय माल्ल्या याने किंगफिशर बिअर पुन्हा लॉन्च केली. आणि वडिलांच्या निधनानंतर विजय माल्ल्या यांनी या व्यवसायाची संपूर्ण धुराच आपल्या हाती घेतली.
प्रथम किंगफिशरची बाटली, नंतर कॅन आणि नंतर 1999 मध्ये, जेव्हा किंगफिशरची स्ट्रॉंग बिअर लॉन्च झाली, तेव्हा ती लोकांना प्रचंड आवडली आणि त्या बिअरने सगळी बाजारपेठ काबिज केली.
किंगफिशर बिअरला आणखी प्रसिद्ध करण्यासाठी, विजय मल्ल्या यांनी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींकडून जाहिरात करण्यात आल्या. तर त्यानंतर 2003 मध्ये किंगफिशर एअरलाइन्सची सुरुवात करण्यात आली.
किंगफिशरचा ब्रँड वाढण्यासाठी पाण्याच्या बाटल्या, ज्यूस आणि इतर अनेक गोष्टी किंगफिशरच्या नावानेही लाँच करण्यात आल्या. त्यामुळे किंगफिशर आज देशात सर्वाधिक विकली जाणारी बिअर असल्याचे म्हटले जाते.
काजोलचा Deepfake Video व्हायरल, कॅमेऱ्यासमोर कपडे बदलताना..