भारतरत्न डॉ. एपीजी अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूच्या रामेश्वरम या अगदी छोट्याशा गावात झाला होता.
अब्दुल कलाम यांनी अणुचाचणीसह अनेक विज्ञानाती नवनवे प्रयोग भारतात केले. भारताचे संरक्षण क्षेत्र बळकट करण्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे.
वैज्ञानिक क्षेत्रातील कामगिरीबरोबरच ते भारताचे राष्ट्रपतीही राहिले होते. 2002 मध्ये अब्दुल कलाम यांची भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पाठिंब्यामुळे त्यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती.
राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात आपले काम चालू ठेवले होते. राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी आपला वेळ विद्यार्थ्यांसोबत घालवला होता.
डॉ.कलाम हे विद्यार्थ्यांसाठी आदर्शाचे ते एक जिवंत आणि उत्तम उदाहरण होते.
सिंगापूरमधील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांना त्यांच्या आयुष्यातील वैयक्तिक एका घटनेवर प्रश्न विचारला होता. तो प्रश्न होता त्यांच्या लग्नाविषयी.
अब्दुल कलाम तुम्ही लग्न का केले नाही असा प्रश्न विचारताच त्यांनी उत्तर दिलं जर लग्न केलं असतं तर माझ्या क्षेत्रातील मला भरीव असं काम करता आलं नसतं असं त्यांनी उत्तर दिलं होतं.
डॉ.अब्दुल कलाम यांची राष्ट्रपती म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती. त्याचबरोबर त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते.
डॉ. कलाम यांनी 27 जुलै 2015 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतरही त्यांचे विचार तरुणांना कायम प्रेरणा देत राहिले आहेत.