Actor Dharmendra : नातवाच्या लग्नसमारंभात आजोबा नाही? कारण...
Photo Credit; instagram
देओल कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. सनी देओलचा मुलगा आणि धर्मेंद्र यांचा नातू करण देओल लग्नबंधनात अडकणार आहे.
Photo Credit; instagram
करण देओलच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. अशा स्थितीत देओल कुटुंबाने एका पार्टीचे आयोजन केले होते, ज्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
Photo Credit; instagram
करणचे आजोबा धर्मेंद्र खूप आनंदी आहेत कारण खूप दिवसांनी त्यांच्या घरात लग्न होत आहे. पण तरीही धर्मेंद्र लग्नसमारंभात सामील होणार नाहीयेत.
Photo Credit; instagram
धर्मेंद्र 18 जूनला नातवाच्या लग्नालाच उपस्थित राहणार आहेत. त्याआधी, ते हळदी-मेहंदीसह कोणत्याही प्री-वेडिंग फंक्शनमध्ये नसतील.
Photo Credit; instagram
यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. आपल्या मुलांनी मोकळेपणाने एन्जॉय करावं, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा अशी धर्मेंद्र यांची इच्छा आहे.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, धर्मेंद्र यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. ते विचार करतात की मी असलो तर मुलं संकोच करतील.
Photo Credit; instagram
'मला असं वाटतं की प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यापासून माझ्या मुलांनी चुकू नये.' धर्मेंद्र यांनी सांगितले की, ते नातवाच्या लग्नाला उपस्थित असतील.
Photo Credit; instagram
करण देओलच्या लग्नाचा दिवस भव्य आणि खास बनवण्यासाठी देओल कुटुंब विशेष तयारी करत आहे. सनीच्या मुलाचे लग्न शाही पद्धतीने होणार आहे.
Photo Credit; instagram
करण देओलची होणारी पत्नी प्रसिद्ध चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात आहे.
Amogh Lila Prabhu : सॉफ्टवेअर इंजिनीअर ते संत… कसा होता प्रवास?