Photo Credit; instagram

'फिल्म पाहिजे तर 'ते' करावंच लागेल', अभिनेत्रीचा मोठा आरोप!

Photo Credit; instagram

दिल चाहता है फिल्म फेम सुचित्रा पिल्लई इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिने साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 

Photo Credit; instagram

अभिनेत्रीने अलिकडेच सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Photo Credit; instagram

तिला एका व्यक्तीचा कॉल आलेला. जो म्हणाला, 'जर तिला साऊथच्या मोठ्या चित्रपटात काम करायचं असेल तर तिला प्रोड्युसरसोबत कॉम्प्रोमाइज करावी लागेल.'

Photo Credit; instagram

सुचित्रा म्हणाली, 'माझ्यासोबत कास्टिंग काउच नाही पण अशी घटना नक्कीच घडली आहे. वर्षभरापूर्वी एक फोन आला होता.' 

Photo Credit; instagram

तुला साउथचा चित्रपट करायचा आहे? यावर मी म्हणाले, 'मी केला आहे पण हा...' तो म्हणाला, 'एक चांगला चित्रपट आहे, एक मोठा अभिनेता-डायरेक्टर आहे.'

Photo Credit; instagram

'मला अभिनेत्याच्या बहिणीचा रोल करायचा होता, जो मुख्य होता. मी म्हटलं चांगलं आहे. पण नंतर तो म्हणाला प्रोड्यूसर अगदी नवीन आहे.'

Photo Credit; instagram

'मला वाटलं फीस कमी देईल. पण तो म्हणाला त्याची पहिली वेळ आहे त्यामुळे कॉम्प्रोमाइज करावं लागेल. मी म्हणाले माहितीये तू कुणाशी बोलतेय मी गेली कित्येक वर्ष इंडस्ट्रीत आहे.'

Photo Credit; instagram

'तो म्हणाला, मॅडम अॅक्टर-डायरेक्टरसोबत नाही पण प्रोड्यूसरसोबत तर करावं लागेल. कारण तो नवीन आहे. मला राग आला मी सांगितलं तुम्ही चुकीच्या व्यक्तीला कॉल केला आहे.'

Photo Credit; instagram

सुचित्रा पिल्लाईने फ्रेंच फिल्म Le prix d'une femme, इंग्लिश फिल्म Guru in Seven आणि मल्ल्याळम फिल्म Oppam मध्येही काम केलं आहे. तिने टीव्ही शोही केला आहे.

पुढील वेब स्टोरी

ही 'उर्फी' नाही बरं... 'हा' ड्रेस पाहून तुम्ही म्हणाल, अरे ही तर...

इथे क्लिक करा