ऐश्वर्याने गाठली पन्नाशी! बर्थडेच्या दिवशी दिसतं होती इतकी सुंदर, पाहा फोटो
ऐश्वर्या राय बच्चनचा 50 वाढदिवस अगदी जोरदार पद्धतीने तिच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत झाला. हा खास वाढदिवस साजरा करण्यासाठी ऐश्वर्याची मुलगी आराध्या बच्चनसोबत मुंबईत एका कार्यक्रमात पोहचली होती. तर यावेळीऐश्वर्याची आईही तिच्यासोबत होती.
ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्त आराध्या आणि ऐश्वर्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आराध्याचे आजीसोबत असलेल्या फोटोंचीही आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
ऐश्वर्या आणि आराध्याचे जसे फोटो दिसत आहेत. तसेच आराध्या आणि तिची आजी वृंदा राय यांचा हात हातात घेऊन काढलेले फोटोही व्हायरल झाले आहेत.
आराध्याच्या क्यूटनेसपणामुळे चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. निळ्या रंगाची पँट आणि पांढऱ्या रंगाच्या टॉपमध्ये आराध्या अगदीच सुंदर दिसत होती.
आराध्याच्या फोटोमध्ये तिने मेकअपही अगदीच हलकासा केला होता. या फोटोमध्ये ती जुन्या हेअरस्टाईलमध्येच दिसून आली.
तर, ऐश्वर्यानेही यावेळी वेगळा असा ऑफ-व्हाइट आणि गुलाबी शरारा सूट परिधान केला होता.