दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. आलियाने तिचा परदेशी बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत लग्न केले आहे.
Photo Credit; instagram
मुंबईत झालेल्या आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोयरच्या लग्झरी लग्नाचे फोटोही समोर आले आहेत. स्वत: वधू-वरांनी ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
फोटोंमध्ये दोघेही मंडपात बसून एकमेकांच्या डोळ्यात बघताना दिसत आहेत. एका फोटोत वर शेन भावूक होताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोत दोघे किस करत आहेत.
Photo Credit; instagram
लग्न आटोपल्यानंतर आलिया आणि शेनने मंडपात सर्वांसमोर एकमेकांचे चुंबन घेतले. लग्नाचे सुंदर फोटो शेअर केल्यानंतर दोघांनी कॅप्शन लिहिले - आज आणि कायमचे.
Photo Credit; instagram
शेन ग्रेगोयरने 11 डिसेंबरला आलिया कश्यपच्या घरी लग्नाची मिरवणूक आणली होती. यावेळी वधूने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.
Photo Credit; instagram
लग्नानंतर संध्याकाळी रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आलिया आणि शेन स्टायलिश अंदाजात दिसले. आलियाने ऑफ-शोल्डर कॉर्सेट आणि स्कर्ट घातला होता.
Photo Credit; instagram
या रिसेप्शन पार्टीत सुहाना खान, अगस्त्य नंदा, अभिषेक बच्चन, मनोज बाजपेयी, अनुभव सिन्हा, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासह अनेक स्टार्सनी हजेरी लावली.