Madhuri Dixit: अॅपलच्या सीईओंनी बॉलिवूड अभिनेत्रीसोबत घेतला मुंबईतील वडापावचा स्वाद! म्हणाले, 'मजा आली'
आयफोन बनवणाऱ्या अॅपल कंपनीचे सीईओ टीम कुक सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.
भारत दौऱ्याच्या पहिल्या दिवशी टीम कुक यांनी मुंबईत बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितची भेट घेतली.
माधुरीसोबत टीम कुक यांनी मुंबईच्या सुप्रसिद्ध असणाऱ्या 'वडा पाव'चा स्वाद घेतला.
अॅपलच्या सीईओंनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये ते माधुरी दीक्षितसोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये बसून बडा पाव खाताना दिसत आहेत.
या ट्वीटसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, 'धन्यवाद माधुरी दीक्षित, पहिल्यांदा मला वडा पावची ओळख करून देण्यासाठी, ते स्वादिष्ट होते.'
Apple चे भारतातील पहिले अधिकृत स्टोअर मंगळवारी, 18 एप्रिल 2023 रोजी मुंबईतील BKC मध्ये सुरू झाले आहे.
सीईओ टीम कूक त्याच्या उद्घाटनासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. या अॅपल स्टोअरमध्ये 100 कर्मचारी काम करतील.
माधुरी दीक्षितसोबत वडापाव खाल्ल्यानंतर टीम मुकेश अंबानी यांच्या घरी अँटिलियाही पोहोचले.
टीम कुक नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.
जिथं कोरलं होतं नाव, तिथं वार करून केली बॉयफ्रेंडची हत्या... प्रसिद्ध मॉडेल अटकेत