BB17 : प्रियांका चोप्राच्या बहिणीची अंकिता लोखंडेला शिवीगाळ, नेमका काय झाला ड्रामा?
Photo Credit; instagram
सध्या बिग बॉस 17 मध्ये, स्पर्धक स्वयंपाकघर आणि जेवणावरून भांडत आहेत. दिल, दिमाग आणि दम या घरांमध्ये वाद सुरू आहे.
Photo Credit; instagram
शोच्या ताज्या एपिसोडमध्ये असे दाखवण्यात आले होते की दम आणि दिमाग असलेल्या घरातील स्पर्धक लोक स्वतःसाठी जेवण बनवतात पण दिल असलेल्या घरातील लोकांना स्वयंपाक करण्यास वेळ मिळत नाही, कारण तिन्ही टीम्सना फक्त 1 तासाच्या आत जेवण बनवायचे होते.
Photo Credit; instagram
त्यानंतर दिमागच्या टीमने त्यांचे जेवण दिलच्या टीमला दिले, जेणेकरून ते उपाशी राहू नयेत. पण स्वयंपाकासाठी कमी वेळ मिळाल्याने अंकिताला खूप राग आला.
Photo Credit; instagram
किचन ड्युटीबाबत अंकिता टीमला पटवून देण्यासाठी गेली. यादरम्यान अंकिताचा मन्नारा चोप्रासोबत कुकिंग टायमिंग आणि स्लॅब साफ करण्यावरून वाद झाला.
Photo Credit; instagram
कसे आणि काय करायचे ते आम्ही स्वतः ठरवू असे मन्नाराने अंकिताला सांगितले. यावर अंकिता मन्नारासाठी दिमाच्या टीमला म्हणते, 'ही अजून लहानच आहे, कोणीतरी हिला समजावून सांगा.'
Photo Credit; instagram
पण मन्नाराला लहान म्हटल्यावर राग येतो. ती अंकितावर ओरडते आणि म्हणते, 'तू वयाने मोठी असशील, पण मी लहान नाहीये.'
Photo Credit; instagram
'ही स्वत:ला काय समजते, सर्व हिलाच सगळं कळतं. मी लहान नाही. मी हिच्यापेक्षा (अंकिता) जास्त चित्रपट केले आहेत.'
Photo Credit; instagram
मन्नारा शीवी देत रागाने म्हणते, 'अंकिता चालाक आहे. यावर मुनव्वर तिला समजावतो की, तिने अशी भाषा वापरू नये.'
Photo Credit; instagram
यावर अंकिताला तिला म्हणते, 'तू पण खूप चालाक आहेस. तुला कोणतंही काम येत नाही. अंकितालाही मन्नाराचा राग येतो आणि ती तिला इडियट म्हणते.'