बिपाशाची लेक झाली 10 महिन्यांची! सर्जरीनंतर आता कशीये तब्येत?
Photo Credit; instagram
बॉलिवूड कपल बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. कारण, त्यांची मुलगी देवी आता 10 महिन्यांची झाली.
Photo Credit; instagram
बिपाशा आणि करणने मुलगी देवीचा 10 महिन्यांचा वाढदिवस साजरा केला. तसंच एका इंटिमेट पार्टीचंही आयोजन केलं.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
व्हिडीओमध्ये बिपाशा आणि करणची छोटी राजकुमारी गुलाबी रंगाच्या फ्रॉकमध्ये दिसतेय. ती बेडवर खेळत आहे.
Photo Credit; instagram
याशिवाय, बिपाशाने इंस्टा स्टोरीवर देवीच्या गोंडस बनी केकचा फोटो देखील शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आमची देवी आज 10 महिन्यांची झाली आहे.'
Photo Credit; instagram
चाहतेही चिमुकल्या देवीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. बिपाशाने नोव्हेंबर 2022 मध्ये मुलीला जन्म दिला.
Photo Credit; instagram
एका मुलाखतीत तिने खुलासा केला होता की, जन्माच्या वेळी देवीच्या हृदयात दोन छिद्र होती. जेव्हा ती तीन महिन्यांची होती, तेव्हा तिच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया झाली, जी 6 तास चालली.
Photo Credit; instagram
मात्र, ती पूर्णपणे बरी आहे. बिपाशा आणि करण त्यांच्या मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.
WWE सोडून रेसलरला व्हायचंय भक्तीत तल्लीन, प्रेमानंद महाराजांनी दिला खास सल्ला!