'ठरलं तर मग!' राघव-परिणिती कोणत्या मुहूर्तावर उरकणार लग्न?
Photo Credit; instagram
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे. दोघांचा मे महिन्यात साखरपुडा झाला.
Photo Credit; instagram
या कपलच्या साखरपुड्यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे. आता यासंबंधित एक नवीन अपडेट समोर आलं आहे.
Photo Credit; instagram
मिळालेल्या माहितीनुसार या वर्षी हे क्यूट कपल सप्टेंबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहे. हे लग्न 25 सप्टेंबरला असण्याची शक्यता आहे.
Photo Credit; instagram
परिणीती आणि राघव यांनी राजस्थान हे त्यांचं ड्रिम वेडिंग डेस्टिनेशन म्हणून निवडलंय.
Photo Credit; instagram
हा भव्यदिव्य विवाह राजस्थानमध्ये होणार आहे. लग्नात परिणीती आणि राघव यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतील. दोघांनी जवळच्या नातेवाईकांनाही आमंत्रित केलं आहे.
Photo Credit; instagram
परिणीतीच्या टीमने लग्नाची तयारी सुरू केली आहे, असे एका अहवालात म्हटलं आहे. परिणिती याबाबत काहीही बोलली नाही.
Photo Credit; instagram
माहितीनुसार, लग्नानंतर गुरुग्राममध्ये त्यांचं ग्रॅण्ड रिसेप्शन होईल.
Photo Credit; instagram
13 मे रोजी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा झाला. यावेळी दोघांच्या कुटुंबासोबत, राजकारणाशी संबंधित लोकही यात सहभागी झाले होते.
Kangana Ranaut ऐश्वर्याबद्दल असं काय म्हणाली? शेअर केला Video