लव्ह की अरेंज मॅरेज? Jaya Kishori ने लग्नाच्या मुद्द्यावर सोडलं मौन!
Photo Credit; instagram
कथावाचक जया किशोरी यांचा जन्म राजस्थानच्या गौड ब्राह्मण कुटुंबात झाला. आज तिचे नाव देशातील प्रसिद्ध प्रेरक वक्त्यांमध्ये आहे.
Photo Credit; instagram
जया किशोरीच्या कथा, व्हिडीओ, रील हे नेहमी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात.
Photo Credit; instagram
जया किशोरी यांनी अलीकडेच लग्नाच्या मुद्द्यावरील मौन सोडलंय. तिने लव्ह की अरेंज्ड मॅरेज करणार हे सांगितले आहे.
Photo Credit; instagram
जया किशोरी म्हणाली, 'ही सामान्य गोष्ट आहे. एका वयानंतर मुलीने लग्न करावे, असा समाजाचा दबाव सुरू होतो. जर कोणाला मी आवडली असेल तर, ते माझ्या घरच्यांसोबत बोलणं करतात.
Photo Credit; instagram
'माझ्यासमोर असे अनेक प्रश्न येतात की लग्न कधी होणार. पण आता इतक्या प्रश्नांनंतर मला लग्न करूच नये असे वाटू लागले आहे कारण आता प्रश्न मला सतावू लागले आहेत.'
Photo Credit; instagram
लग्नाबद्दल जया पुढे म्हणाली, 'लग्न कधी होईल देवच जाणो. पण सध्या माझा लग्नाबाबत कोणताही प्लॅन नाही कारण मी सध्या माझ्या प्रोजेक्टमध्ये खूप व्यस्त आहे.'
Photo Credit; instagram
अरेंज्ड मॅरेजवर विश्वास आहे की, लव्ह मॅरेजवर यावर जया किशोरीने उत्तर दिलं.
Photo Credit; instagram
ती म्हणाली, 'मी म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे या गोष्टींसाठी फारसा वेळ नाही. अरेंज्ड मॅरेज असो की लव्ह मॅरेज, दोन्हीमध्ये मला काहीही अडचण नाही. बघूया काय होते ते.'
Photo Credit; instagram
'माझ्या कुटुंबाकडून माझ्यावर अजिबात दबाव नाही. ते खूप आनंदी आहेत कारण मी आनंदी आहे.' असं जया पुढे म्हणाली.
Virat Kohli चा फिटनेस मंत्रा, खातो 90% उकडलेलं अन्न; कारण जाणून तुम्हीही खाल!