विराटची शेजारीन आहे Katrina Kaif, क्रिकेटविषयी म्हणाली...
Photo Credit; instagram
कतरिना कैफ तिच्या नवीन चित्रपट 'टायगर 3'मुळे चर्चेत आहे. यादरम्यान, तिने इंस्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग सेशन ठेवलं. यावेळी अनेक चाहत्यांनी तिला प्रश्न विचारले.
Photo Credit; instagram
कतरिनाच्या चाहत्यांनी तिला 'टायगर 3' चित्रपट, सलमान खान, विकी कौशल आणि तिच्या वर्कआउटसह विराट कोहलीबद्दल प्रश्न विचारले.
Photo Credit; instagram
सध्या देशभरात आयसीसी विश्वचषक २०२३ च्या फायनलची जोरदार चर्चा आहे. विराट कोहलीने यावेळी जबरदस्त कामगिरी केली.
Photo Credit; instagram
अशा स्थितीत अनेक सेलिब्रिटींनी क्रिकेटरचे कौतुक केले. कतरिनानेही विराटचं कौतुक करत चाहत्यांची मनं जिंकली.
Photo Credit; instagram
निळ्या जर्सीमधील विराटचा फोटो शेअर करताना कतरिनाने लिहिले की, 'सुपरस्टार, प्रेरणा... आणि कमालचा शेजारी.'
Photo Credit; instagram
तुम्हाला माहीत नसेल पण कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा या चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघेही मुंबईत एकाच इमारतीत राहतात.
Photo Credit; instagram
कतरिना कैफने विराट कोहलीची केलेली स्तुती चाहत्यांना खूप आवडली. याशिवाय 'टायगर 3'साठीही अभिनेत्रीचे कौतुक होत आहे.
Photo Credit; instagram
'टायगर 3'मध्ये कतरिना आणि सलमान खानची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. दिवाळीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली.