Photo Credit; instagram

Lalbaugcha Raja मंडपातून 'या' अभिनेत्रीला धक्के मारून काढलं बाहेर! 

Photo Credit; instagram

'कुमकुम भाग्य' आणि 'पंड्या स्टोअर' फेम अभिनेत्री सिमरन बुधरूपचा एक धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर आला आहे.

Photo Credit; instagram

नुकतीच ती तिच्या आईसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेली होती, पण लालबागच्या राजाला भेट देण्याचा सिमरनचा अनुभव खूपच वाईट होता.

Photo Credit; instagram

लालबागचा राजा मंडळाचे कार्यकर्ते आणि बाऊन्सरनी अभिनेत्री सिमरनसोबत गैरवर्तन केल्याचं समोर आलं आहे.

Photo Credit; instagram

गणपती दर्शनासाठी गेलेल्या अभिनेत्रीसोबत मंडपात पहारा देणारे बाउन्सर अतिशय उद्धटपणे वागत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Photo Credit; instagram

हा सगळा गोंधळ तेव्हा सुरू झाला जेव्हा सिमरन गणपतीचे दर्शन घेत होती आणि तिची आई फोटो क्लिक करू लागली.

Photo Credit; instagram

हे पाहून एका कार्यकर्त्यांने अचानक तिच्या आईचा फोन हिसकावून घेतला. सिमरनच्या आईने तिचा फोन परत मागितल्यावर तिला बाजूला ढकलून देण्यात आलं.

Photo Credit; instagram

व्हिडिओमध्ये, अभिनेत्री 'असे करू नका!' असं ओरडताना पाहायला मिळत आहे. 

Photo Credit; instagram

'तुम्ही काय करत आहात? मी गणपतीच्या दर्शनासाठी आले होतो, पण माझ्यासोबत असं होईल हे मला माहीत नव्हते.' असं अभिनेत्री म्हणत असल्याचं दिसतंय

Photo Credit; instagram

लालबागचा राजा मंडपामध्ये सिमरन बुधरूपसोबत अशी कृती घडली कारण ती मोठी टीव्ही अभिनेत्री नाही. 

Photo Credit; instagram

लालबागचा राजा मंडपात हे अभिनेत्रीसोबत जे घडलं त्यापेक्षा अधिक वाईट वागणूक ही सामान्य भाविकांना मिळत असल्याचंही आता समोर आलं आहे.

Photo Credit; instagram

लालबागच्या राजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दर्शनासाठी आलेल्या सर्वसामान्यांना बाहेर ओढले जात आहे.

Photo Credit; instagram

लालबागच्या राजाच्या मंडपात सर्वसामान्यांना कशी वागणूक दिली जाते याचा हा व्हायरल व्हिडिओ पुरावा आहे. तर सेलिब्रिटी जेव्हा दर्शनासाठी येतात तेव्हा त्यांना वेगळी वागणूक असते.

पुढील वेब स्टोरी

कर्वी फिगरच्या मुलींचं हे आहे खास गुपित, तुम्हालाही...

इथे क्लिक करा