Photo Credit; instagram

स्मिता पाटीलच्या मुलाने केलं दुसरं लग्न, पण वडिलांना नाही बोलावलं!

Photo Credit; instagram

राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरने प्रेयसी प्रिया बॅनर्जीशी लग्न केले आहे. प्रतीक आणि प्रियाने घरीच सात फेरे घेत लग्न केलं आहे.

Photo Credit; instagram

तथापि, प्रतीकने त्याचे वडील राज बब्बर किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला त्याच्या लग्नाला आमंत्रित केले नाही. लग्नाला आमंत्रित न केल्याने प्रतीकच्या कुटुंबाला वाईट वाटलं आहे.

Photo Credit; instagram

एचटीला दिलेल्या मुलाखतीत, प्रतीक बब्बरचा सावत्र भाऊ आर्य बब्बरने त्याच्या भावाच्या लग्नाचे आमंत्रण न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्याने असेही म्हटले की, प्रतीक बऱ्याच काळापासून त्यांच्या कोणत्याही कॉल किंवा मेसेजला उत्तर देत नाहीये.

Photo Credit; instagram

मुलाखतीत आर्यला विचारण्यात आले की, भावाच्या लग्नानंतर त्याने प्रतीकला शुभेच्छा दिल्या का किंवा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला का?

Photo Credit; instagram

यावर आर्य बब्बर म्हणाला, 'आम्ही प्रतीकशी बोलण्याचा प्रयत्न केला किंवा नाही केला याने फरक पडणार नाही, पण गेल्या काही महिन्यांपासून त्याने आमच्या कोणत्याही कॉलला उत्तर दिले नाही.'

Photo Credit; instagram

'मला माहीत नाही का? पण हे खूप वेदनादायक आहे. मला खूप वाईट वाटले आहे. मला माहीत नाही की कोणी प्रतीकला भडकवत आहे की आणखी काही आहे.'

Photo Credit; instagram

'मी त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. पण पालकांच्या आशीर्वादाशिवाय इतके मोठे पाऊल उचलणे योग्य नाही. आम्हाला माहितही नव्हतं की ते लग्न करणार आहेत.'

Photo Credit; instagram

आर्य बब्बर म्हणाला की, 'प्रतीकने त्याला, त्याच्या आईला आणि बहिणीला आमंत्रित केले नसते तर तो समजू शकतो, पण किमान त्याने त्याचे वडील राज बब्बर यांना तरी आमंत्रित करायला हवे होते, जे त्याची आई स्मिता पाटीलसाठी सर्व काही होते.'

Photo Credit; instagram

प्रतीक बब्बरचे प्रिया बॅनर्जीसोबतचे हे दुसरे लग्न आहे. त्याचे पहिले लग्न 2019 मध्ये सान्या सागरशी झाले होते, परंतु 2023 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर प्रतीक आणि प्रिया एकत्र राहत होते. हे जोडपे आता पती-पत्नी बनले आहे.

पुढील वेब स्टोरी

अभिनेत्री तब्बूचे 'हे' फोटो पाहून तुमची झोप उडेल!

इथे क्लिक करा