Malaika Arora ने 7 वर्षांनंतर सांगितलं घटस्फोटाचं कारण!
Photo Credit; instagram
मलायका अरोरा आणि अरबाज खान हे एकेकाळी बॉलीवूडचे पॉवर कपल होते, पण 2017 मध्ये लग्नाच्या 19 वर्षानंतर घटस्फोट घेऊन त्यांनी चाहत्यांना धक्का दिला.
Photo Credit; instagram
अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलाइकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तिच्यावर अरबाजकडून मोठ्या प्रमाणात पोटगी घेतल्याचाही आरोप होता.
Photo Credit; instagram
आता मलायकाने मुलाखतीत तिच्या घटस्फोटाबाबत अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. मलायकाने हेही सांगितले की, 'तिने वयाच्या 25 व्या वर्षी लग्न का केले?'
Photo Credit; instagram
मलायका म्हणाली, 'मी अशा कुटुंबात वाढलेली नाही जिथे मला सांगितले गेले होते की या वयात तुला लग्न करावे लागेल.'
Photo Credit; instagram
'या उलट माझ्या कुटुंबाने मला आयुष्य मोकळेपणाने जगायला शिकवले, बाहेर जा, मजा करा, लोकांना भेट असं सांगितलं.'
Photo Credit; instagram
'पण माझ्या मनात काय आलं माहीत नाही. मी म्हणाले की मला वयाच्या 22-23 व्या वर्षी लग्न करायचं आहे. माझ्यावर कोणीही दबाव आणला नाही, तो माझा स्वतःचा निर्णय होता, कारण त्यावेळी माझ्यासाठी तो सर्वोत्तम पर्याय होता.'
Photo Credit; instagram
पण लग्नाच्या काही वर्षांनंतर मलायकाच्या लक्षात आलं की तिला जे हवंय ते हे नाही. मग जेव्हा तिने अरबाजपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिला खूप टोमणे ऐकावे लागले.'
Photo Credit; instagram
मलायका घटस्फोटावर म्हणाली, 'जेव्हा मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा मला वाटत नाही की इंडस्ट्रीमध्ये अनेक महिला घटस्फोट घेऊन पुढे जात होत्या.'
Photo Credit; instagram
'त्यावेळी मला वाटले की मुलासाठी आणि करिअरसाठी मला आतून आनंदी राहावे लागेल, तरच मी माझ्या मुलाला आनंदी ठेवू शकेन आणि मी तेच केले.'