'ते' गाणं ऐकून नाना पाटेकरांचा चढला पारा, भन्साळींना फोन करून म्हणाले...
Photo Credit; instagram
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुन्हा एन्ट्री करत आहेत. यामध्ये ते डॉक्टर भार्गवच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Photo Credit; instagram
एका मुलाखतीत नानांनी सत्य घटनांवर बनलेल्या चित्रपटांबद्दल सांगितलं. अशा चित्रपटांनी योग्य वस्तुस्थिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे त्यांचं मत मांडलं.
Photo Credit; instagram
ते म्हणाले, 'जेव्हा तुम्ही सत्य कथा दाखवता, तेव्हा त्यातील तथ्यांशी तुम्ही खेळू शकत नाहीत.'
Photo Credit; instagram
'जर ही सत्यकथा असेल तर त्यातील सर्व काही खरं असलं पाहिजे. हे तुम्हाला भन्साळींच्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळते.'
Photo Credit; instagram
संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटातील मल्हारी हे गाणे ऐकून आपण निराश झाल्याचे नानांनी सांगितले. यासाठी त्यांनी दिग्दर्शकाला फोनही केला.
Photo Credit; instagram
ते म्हणाते, 'मल्हारी या गाण्याने मला आनंद झाला नाही. मी थेट भन्साळींना फोन केला आणि म्हणालो की, ही वाट लावली हे काय आहे?'
Photo Credit; instagram
'मला हे आवडलं नाही म्हणून मी लगेच दिग्दर्शकाला फोन करून माझं मत मांडलं. लोकांना ते आवडेल की नाही याची मला पर्वा नाही. मला ते आवडलं नाही तर मी तसं सांगितलं.'
Photo Credit; instagram
नानांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, त्यांचा आगामी चित्रपट 'द व्हॅक्सीन वॉर' 28 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ते अनिल शर्माच्या जर्नी या चित्रपटातही दिसणार आहेत.
Bail Pola 2023 : महादेवाच्या मंदिरात नंदी बाहेर का बसलेला असतो?