Rashmika Mandanna कुणाला करतेय डेट? रणबीरने केला खुलासा
Photo Credit; instagram
सध्या रणबीर कपूर त्याच्या 'अॅनिमल' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी ते, नंदामुरी बालकृष्णच्या 'अनस्टॉपेबल विथ एनबीके 2' या शोमध्ये पोहोचले होते.
Photo Credit; instagram
रणबीरसोबत चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी आणि को-अॅक्ट्रेस रश्मिका मंदाना देखील उपस्थित होती. यावेळी मस्करीत त्याने रश्मिकाच्या रिलेशनबाबत खुलासा केला.
Photo Credit; instagram
बालकृष्णाने संदीपला त्याचा पहिला चित्रपट 'अर्जुन रेड्डी' आणि आगामी 'अॅनिमल' चित्रपटाचे पोस्टर एकत्र पडद्यावर दाखवले.
Photo Credit; instagram
यावर रणबीर म्हणाला की, रश्मिकाला विचारले पाहिजे की तिचा आवडता अभिनेता कोण आहे, मी की विजय देवरकोंडा? या प्रश्नाला रश्मिकाने डिप्लोमॅटिक उत्तर देत 'माझे अर्जुन रेड्डीसोबत कनेक्शन आहे,' असे सांगितले.
Photo Credit; instagram
'अॅनिमलही माझा चित्रपट आहे, त्यामुळे दोन्ही माझे आवडते हिरो आहेत.' यानंतर तिला विचारले जाते की अर्जुन रेड्डीशी काय कनेक्शन आहे?
Photo Credit; instagram
रश्मिका स्तब्ध होऊन म्हणते, 'हैदराबादला गेल्यावर मी पहिला चित्रपट पाहिला अर्जुन रेड्डीच पाहिला होता'.
Photo Credit; instagram
अभिनेत्रीचे उत्तर ऐकल्यानंतर रणबीरला राहावलं नाही आणि म्हणाला, 'अर्जुन रेड्डीच्या सक्सेस पार्टीतच संदीप रश्मिकाला भेटला. विजयच्या टेरेसवर ही पार्टी होती.'
Photo Credit; instagram
रणबीरचे बोलणे ऐकून रश्मिका गालात हसत म्हणाली, 'त्याला ही सर्व माहिती कोण देत आहे?'
Photo Credit; instagram
शोच्या मंचावर विजय देवरकोंडाला कॉलही करण्यात आला होता. दोघांच्या बोलण्यातून त्यांच्यात काहीतरी सुरू असल्याचं वाटलं.