Photo Credit; instagram

'मागून हात आला अन् मी...', सई ताम्हणकरने सांगितली भयावह घटना

Photo Credit; instagram

अभिनेत्री सई ताम्हणकर ही तिच्या बोल्डनेससह बिनधास्त, बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते.

Photo Credit; instagram

ती मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत येते.

Photo Credit; instagram

नुकत्याच एका मुलाखतीत तिने तिच्यासोबत घडलेला एक भयानक प्रसंग सांगितला. 

Photo Credit; instagram

स्ट्रगल काळात आपल्यासोबत घडलेला एक अंगावर आणणारा प्रसंग सईने शेअर केला आहे.

Photo Credit; instagram

सईने सांगितलं की, सांगली ते मुंबई असा बस प्रवास ती करायची. या काळात तिला एक वाईट अनुभव आला.

Photo Credit; instagram

ती म्हणाली की, 'स्ट्रगल काळात सांगलीतून बसायचे आणि सकाळी मुंबईत उतरायचे.'

Photo Credit; instagram

'एकदा बसने प्रवास करत असताना माझ्या मागच्या सीटवर एक मुलगा बसला होता. मागच्या सीटवरून एक हात आला आणि त्याने मला दंडाजवळ पकडले.' 

Photo Credit; instagram

'आधी मी घाबरले मग त्याचा हात पकडला जोरात ओढला आणि पिरगाळला.' 

Photo Credit; instagram

'त्यानंतर त्याला म्हटलं, भावा परत हा हात इकडे आला तर मोडून टाकेल. मी कोणाला घाबरत नाही.'

Photo Credit; instagram

तसंच, मुंबई हे शहर महिलांसाठी सुरक्षित असल्याचेही सईने सांगितले. 

Photo Credit; instagram

'मुंबई खूप चांगले शहर आहे. तुम्ही रात्री प्रवास करत असाल आणि तुमच्यासोबत काही घडले तर लोकं मदतीला येतात.' असं ती बोलली.

पुढील वेब स्टोरी

Astro: स्वप्नात पैसा दिसणे शुभ की अशुभ?

इथे क्लिक करा