'असं कुठलंही ड्रग्ज नाही जे मी...'; संजय दत्तने सांगितली 'ती' गोष्ट!
Photo Credit; instagram
अभिनेता संजय दत्तने 29 जुलै त्याचा 65वा वाढदिवस साजरा केला.
Photo Credit; instagram
संजय दत्तने आयुष्यात अनेक अडचणी पाहिल्या आहेत. तो एकेकाळी तुरुंगातही गेला होता. तिथे जे काही त्याच्यासोबत घडलं होतं ते धक्कादायक होतं.
Photo Credit; instagram
तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर संजय दत्तने याविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. तिथे खूप माशा असल्याचे त्याने सांगितले होते.
Photo Credit; instagram
तो म्हणाला होता की, 'अनेकवेळा डाळींमध्येही माश्या असायच्या. मी माशी बाहेर काढायचो आणि मग जेवायचो.'
Photo Credit; instagram
आपल्या मुलांना तुरुंगाची माहिती नसल्याचे संजयने सांगितले होते. मुलांना कधीही तुरुंगात आणू नको, असे त्याने पत्नी मान्यताला सांगितले होते.
Photo Credit; instagram
संजय पुढे म्हणाला, 'जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा विमानतळावर हजारो पोलीस माझ्याकडे बंदुका दाखवत उभे होते, जणू काही मी ओसामा बिन लादेन आहे.'
Photo Credit; instagram
वजन वाढण्याबाबत संजय म्हणाला, 'मी खूप दारू प्यायचो. एके दिवशी मला वाटले की माझे पोट खूप बाहेर आले आहे. मला याची लाज वाटली.'
Photo Credit; instagram
त्याने त्याच्या ड्रग्जच्या व्यसनाबद्दलही सांगितले आणि म्हणाला, 'जगात असे कोणतेही ड्रग्ज नाही जे मी घेतले नाही. उपचारासाठी गेल्यावर मी यादीतील प्रत्येक गोष्टीवर टीक केली.'
Photo Credit; instagram
संजय दत्तचा प्रवास खूप खडतर होता. सध्या, तो आपल्या कुटुंबासह आणि मुलांसह चांगले जीवन जगत आहे.