लोकप्रिय अभिनेत्री ममता कुलकर्णी आता अध्यात्माच्या मार्गावर निघाली आहे. तिने काही वर्षांपूर्वीच शोबिझला अलविदा केलं आहे.
Photo Credit; instagram
ममता चित्रपटांमधील तिच्या बोल्ड अभिनयाने चर्चेत आली होती. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला तिने एका मासिकासाठी सेमी-न्यूड कव्हर शूट केले होते.
Photo Credit; instagram
तिच्या या फोटोशूटवरून खूप वाद झाला होते. प्रकरण न्यायालयात पोहोचले होते, खटला वर्षानुवर्षे चालला. आता 'आप की अदालत' या शोमध्ये ममताने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Photo Credit; instagram
ती म्हणते की, तेव्हा ती लहान होती. त्यावेळी तिला नग्नता आणि सेक्सबद्दल काहीच समज नव्हती. त्यावेळी ती नववीत शिकत होती.
Photo Credit; instagram
फोटोशूट करण्यापूर्वी, मासिकाच्या लोकांनी तिला संदर्भ म्हणून अभिनेत्री डेमी मूरचा फोटो दाखवला होता, जो तिला अश्लील वाटला नाही.
Photo Credit; instagram
'मी एकदा तर म्हटलं होतं की मला नग्नतेबद्दल माहिती नाही. मी व्हर्जिन आहे. पण हे लोकांना पचवता आले नाही.'
Photo Credit; instagram
'अनेकांचा असा विश्वास होता की स्ट्रगलर्स इंडस्ट्रीत येण्यासाठी काहीही करतात. तथापि, काही लोक पैशासाठी हा मार्ग निवडतात. पण माझ्या बाबतीत असं नव्हतं.'
Photo Credit; instagram
ममता कुलकर्णीने वक्त हमारा है, क्रांतीवीर, करण अर्जुन, चायना गेट, बाजी, आंदोलन, सबसे बडा खिलाडी या चित्रपटांमध्ये काम केले आहे.