Photo Credit; instagram

लाडू, ज्यूस, पॉपकॉर्न... 'वनतारा' मध्ये हत्तींसाठी खास मेजवानी!

Photo Credit; instagram

गुजरातमधील जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या ग्रीन बेल्ट परिसरात तयार करण्यात आलेल्या 'वनतारा' या प्राणी संग्रहालयात देश-विदेशातील शोषित आणि जखमी प्राण्यांना आणले जाते आणि त्यांच्यावर उपचार केले जातात.

Photo Credit; instagram

अनंत अंबानी यांनी इंडियाटूडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, वंतारामध्ये हत्तींना कोणत्या प्रकारचे अन्न दिले जाते.

Photo Credit; instagram

अनंत अंबानी म्हणाले, 'वंतारा'मधील मुख्य पोषण तज्ञाचे नाव प्रोफेसर पेट्रा असून त्या जर्मनीच्या आहेत. त्यांच्या हाताखाली 40 भारतीय पोषणतज्ञ आहेत.' 

Photo Credit; instagram

'हत्तींना त्यांच्या आहारात लाडू दिले जातात. प्रोफेसर पेट्रा यांनी लाडूच्या रेसिपीमध्ये खनिजे आणि घटक जोडले.

Photo Credit; instagram

'हे लाडू माणसंही खाऊ शकतात. हत्तींना रोज वेगवेगळ्या प्रकारचे लाडू दिले जातात.'

Photo Credit; instagram

'ज्या हत्तींचे वय 80 वर्षांहून अधिक आहे आणि त्यांना दातांनी चावता येत नाही, त्यांना ज्यूस दिले जातात.'

Photo Credit; instagram

'हत्तींना त्यांच्या रोजच्या आहारात समाविष्ट असलेली खिचडीही दिली जाते. केरळमधील पशुवैद्यकाने खिचडीमध्ये कोणते पदार्थ जोडले जातात याबद्दल सांगितले आहे.

Photo Credit; instagram

'जेव्हा हत्तींना औषध दिले जाते किंवा त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जातात तेव्हा त्यांना ट्रीट म्हणून पॉपकॉर्न दिले जाते.'

Photo Credit; instagram

'हत्ती रोज भाकरीही खातात. त्यांच्यासाठी खास रोट्या बनवल्या जातात.

Photo Credit; instagram

'तसंच हिमाचल प्रदेशातील रसाळ सफरचंदही हत्तींना खाऊ घातली जातात.' असे अनंत अंबानी म्हणाले.

पुढील वेब स्टोरी

Ambani : भारतीय संस्कृतीच्या रंगात Bill Gates ही रंगले!

इथे क्लिक करा