सलमान खानच्या नव्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. त्याला मिस्ट्री गर्लसोबत पाहिल्यानंतर चाहते संभ्रमात पडले आहेत.
Photo Credit; instagram
सलमानने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर मिस्ट्री गर्लसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे.
Photo Credit; instagram
फोटोमध्ये सलमान आणि त्याच्या मिस्ट्री गर्लने मॅचिंग आउटफिट कॅरी केलं आहेत. सलमानच्या चेहऱ्यावर हलके हसू दिसले.
Photo Credit; instagram
मात्र, त्यांनी पोस्टमध्ये मिस्ट्री गर्लचा चेहरा दाखवलेला नाही. पण कॅप्शनमध्ये लिहिले, ' मी उद्या तुमच्यासोबत माझ्या काळजाचा एक छोटासा तुकडा शेअर करेन.'
Photo Credit; instagram
'दोघांच्या कपड्यांवर 27/12 लिहिलेले आहे. ही सलमानची जन्मतारीख आहे. दबंग खानची पोस्ट पाहिल्यानंतर चाहते संभ्रमात पडले आहेत.'
Photo Credit; instagram
कमेंट सेक्शनमध्ये सलमानच्या पोस्टवर काही लोक म्हणत आहेत, भाईजानने गुपचूप लग्न केले आहे असे दिसते.
Photo Credit; instagram
पण, सलमान खानच्या पोस्टमध्ये दिसणारी मुलगी त्याची भाची अलिजेह असल्याचं बोललं जात आहे. अलीझेह अग्निहोत्री 'फरे' चित्रपटातून पदार्पण करत आहे.
Photo Credit; instagram
अलीझेहचा 'फरे' हा चित्रपट २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या सलमान आपल्या भाचीच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.
चित्रपटाची कहाणी Nushratt सोबत प्रत्यक्षात घडली! हल्ल्यापूर्वीचा Video व्हायरल