ओल्ड मंक नंतर, बकार्डी रम हिवाळ्यात अधिक लोक पित असतात. जे लोक बकार्डी रम घेत असतात त्यांची रोचकताही अगदीच वेगळी असते.
दारु कोणतीही असो मात्र प्रत्येक दारूच्या बाटलीवर कंपनीने छापलेल्या लोगोला नक्कीच एक वेगळा अर्थ असतो.
अशा अनेक वाईन आहेत ज्यांचे नाव एखाद्या प्राण्यावरून किंवा लोगोच्या नावावरुन आहेत. त्यातील एक आहे बकार्डी. त्याचा लोगो बॅट म्हणजेच वटवाघूळ.
या रमचा लोगो बॅट म्हणजेच वटवाघूळ का ठेवला गेला त्याची कथाही खूप रंजक आहे. आज आम्ही तिच तुम्हाला सांगणार आहोत.
ज्या व्यक्तीने बकार्डी रमचा शोध लावला तो 'डॉन फॅकुंडो बकार्डी मासो' आहे, परंतु त्याचा लोगो त्याची पत्नी डोना अमालियाने ठरवला होता.
स्पेनमध्ये वटवाघुळ हे उत्तम आरोग्य आणि एकतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे असे मानले जाते की ते घरात ठेवल्याने सौभाग्य प्राप्त होते.
एके दिवशी जेव्हा फॅकुंडोची पत्नी कंपनीच्या डिस्टिलरीमध्ये पोहोचली होती तेव्हा तिला छतावर बरीच फळे आणि वटवाघळांचा कळप दिसला होता.
त्यामुळे या अशा परिस्थितीत त्यांनी स्पॅनिश आणि क्यूबन लोकांसाठी बॅटचे म्हणजेच वटवाघूळाचे महत्त्व समजून घेतले आणि बकार्डीला बॅटचा लोगो बनवण्याचा निर्णय घेतला.
व्हिस्की, ब्रँडी आणि रम तिन्हीही आहेत दारुच, मग नेमका फरक काय?